Homeताज्या बातम्यादेश

कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्या

डी.के. शिवकुमार उपमुख्यमंत्री ः उद्या शपथविधी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँगे्रसने एकहाती सत्ता मिळवली असली तरी, मुख्यमंत्रीपदी कोण, असा पेच निर्माण झाला होता. काँगे्र

झिम्बाब्वेचे महान क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांचे निधन
लौकीत नागरीकांचे कोरोना लसीकरण
जैश-ए-मोहम्मदशी संबंधित काश्मीर टायगर्सवर बंदी घाला

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँगे्रसने एकहाती सत्ता मिळवली असली तरी, मुख्यमंत्रीपदी कोण, असा पेच निर्माण झाला होता. काँगे्रस नेत्यांची सिद्धरामय्या यांच्या नावाला पसंदी होती, मात्र या निवडणुकीत पक्षाला निर्विवाद वर्चस्व मिळवून देणारे नेते डी.के. शिवकुमार मुख्यमंत्रिपदावर आडून होते. अखेर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी समजूत काढल्यानंतर त्यांची उपमुख्यमंत्री निवड करण्यात आल्याची घोषणा के. सी. वेणूगोपाल यांनी गुरूवारी केली आहे. नवीन सरकारचा उद्या, शनिवारी 20 मे रोजी बेंगळुरू येथे शपथविधी होणार आहे.
सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची गुरुवारी संध्याकाळी  बैठक बोलावण्यात आली आहे. यानंतर काँग्रेस नेते राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील. तत्पूर्वी, मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोन्ही नेत्यांनी बुधवारी दिल्लीत जाऊन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती. शिवकुमार यांनी बुधवारी रात्री सुरजेवाला यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल आणि सुरजेवाला यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी चर्चा केली. सिद्धरामय्या यांनी रात्री वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी आणि सुरजेवाला यांच्याशी चर्चा केली. दिवसभर चाललेल्या राजकीय रस्सीखेचानंतर रात्री सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाचा कारभार सोपवण्याचा निर्णय झाला.

सिद्धरामय्या दुसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदी- सिद्धरामय्या 1983 साली पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून कर्नाटक विधानसभेत निवडून आले. 1994 मध्ये जनता दल सरकारमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री झाले. एच. डी. देवेगौडा यांच्यासोबत वाद झाल्यानंतर जनता दल सेक्युअरची साथ सोडली. 2008 मध्ये काँग्रेसचा हात पकडला. सिद्धरमय्या 2013 ते 2018 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. आतापर्यंत त्यांनी 12 निवडणुका लढल्या. त्यापैकी नऊ निवडणुकांमध्ये जिंकले. सात किलो अन्न देणारी भाग्य योजना, शाळेत जाणार्‍या मुलांना 150 ग्राम दूध आणि इंदिरा कँटीन या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या योजना आहेत.

COMMENTS