सातारा / प्रतिनिधी : छत्रपती शिवरायांचे थेट बारावे वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवार,
सातारा / प्रतिनिधी : छत्रपती शिवरायांचे थेट बारावे वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवार, दि. 13 रोजी सायंकाळी 5.45 वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त सातारा शहरात धडकताच सातारकरावर दु:खाचा डोंगर कोसळला. ते सध्याचे राजसभेचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे चुलते होते.
शांत संयमी सुसंस्कृत व आपल्या साधेपणाने ओळखले जाणारे सातारचे राजे म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले त्यांचा जन्म 23 एप्रिल 1947 मध्ये झाला. साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान होते. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सलग सहा वर्ष शाहू नगरीचे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली. 15 मे 1985 ते 16 डिसेंबर 1991 पर्यंत ते शाहू नगरीचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या काळात त्यांनी समाज उपयोगी विविध काम केली. सातारच्या राजघराण्यातील खा. श्री. छ. उदयनराजे व आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे यांचे वैर ज्या वेळेस विकोपाला गेले होते. त्या वेळी दोघांना एकत्र आणून राजघराण्यातील वैरत्व संपवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. हे सातारकर कधीच विसरू शकत नाहीत. त्यांना खेळाविषयी प्रचंड आवड होती. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे ते राज्य उपाध्यक्ष होते. तसेच शिक्षण क्षेत्रात ही आरे गावच्या श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. शिवतेज माध्यमिक विद्यालय आरे या संस्थेची उल्लेखनीय कार्य जे आजपर्यंत चालू आहे. त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज सेवाधाम अग्नि मंदिर करंजे यांचे ते कार्याध्यक्ष होत.
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले हे गेले 75 वर्ष सातार्यातील आदालतवाडा येथे राहत होते. तो आदालतवाडा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून न्यायनिवाडा करणारा वाडा म्हणून परिचित होता. आजही या वाड्यातून दिलेला शब्द अथवा आदेश हा सातारकर सन्मानपूर्वक अंतिम मानत असत. अशा या राजांचे पार्थिव सातारा येथील अदालतवाडा येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
COMMENTS