म्हसवड / वार्ताहर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत सातारा विभागीय खो-खो महिला स्पर्धा 2022 चे आयोजन मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे दि. 17 ऑ
म्हसवड / वार्ताहर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत सातारा विभागीय खो-खो महिला स्पर्धा 2022 चे आयोजन मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे दि. 17 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत सातारा विभागातील विविध महाविद्यालयाचे संघांनी सहभाग घेतला होता. श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवडच्या संघाने पहिल्या फेरीत एलबीएस महाविद्यालय, सातारा संघास नमवून दुसर्या फेरीत प्रवेश केला. दुसर्या फेरीत धनजंय गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा या संघास नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत अटातटीच्या लढतीत संघास हार मानावी लागली. या स्पर्धेत संघाने चतुर्थ क्रमांक मिळवून शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय खो-खो स्पर्धेसाठी पाञता मिळविली. या संघात कु. अक्षता खाडे, कु. रुपाली सावंत, कु. आरती बाबर, कु. हर्षदा सांवत, कु. नम्रता खाडे, कु. भाग्यश्री लोखंडे, कु. कल्याणी बाबर, कु. अनुजा ढेकळे, कु. आशा तोरणे, कु. श्रध्दा गायकवाड, कु. चैताली खाडे, कु. स्वाती औताडे, कु. अंकिता सावंत, कु. सानिका चव्हाण या खेळाडूंचा समावेश होता. यशस्वी संघास प्रा. प्रिंयका खांडेकर व प्रा. तायाप्पा शेंडगे यांनी मार्गदर्शन केले.
शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय खो-खो स्पर्धा दि. 20 व 21 ऑक्टोंबर 2022 रोजी एसजीएम महाविद्यालय, कराड येथे ठिकाणी होणार आहेत. तसेच सातारा विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत 65 ते 67 किलो वजन गटांमध्ये श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयातील विद्यार्थी यश हितेंद्र माने यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्याच्या वतीने महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुजित जाधव यांनी कास्य पदक स्वीकारले.
COMMENTS