श्रीगोंदा : तक्रारदार हे खरेदी विक्री व्यवसाय करत असल्याने त्यांची दुय्यम निबंधक कार्यालयात नियमित दस्त नोंदणी होत असते. त्यांच्याकडे दुय्यम निब

श्रीगोंदा : तक्रारदार हे खरेदी विक्री व्यवसाय करत असल्याने त्यांची दुय्यम निबंधक कार्यालयात नियमित दस्त नोंदणी होत असते. त्यांच्याकडे दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीसाठी पाच हजार व मागील दस्त नोंदणीची बाकी दहा हजार असे पंधरा हजार रुपये दिल्यानंतरच दस्तांची नोंद होईल असे सांगत पंधरा हजार रुपयांची मागणी केली असता तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडुन पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना श्रीगोंदा दुय्यम निबंधक सचिन खताळ यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. हि घटना बुधवारी दिनांक २६ मार्च रोजी संध्याकाळी घडली. दुय्यम निबंधक सचिन खताळ याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकाच महिन्यात लाचलुचपत विभागाची श्रीगोंदा तालुक्यात हि दुसरी कारवाई झाल्याने शासकीय कर्मचाऱ्यात एकाच खळबळ उडाली आहे.
COMMENTS