Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ह.भ.प.बाबाजी महाराज चाळक यांच्या हस्ते लोकनेते आण्णासाहेब शेलार यांच्या श्रीगोंदा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

श्रीगोंदा :- मा जिल्हापरिषद उपाध्यक्ष लोकनेते आण्णासाहेब शेलार यांचे सुपुत्र व बेलवंडी गावचे लोकनियुक्त सरपंच ऋषिकेश शेलार यांच्या वाढदिवसाचे औचि

श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
संगमनेरमध्ये 3 ते 4 सप्टेंबरला इंदिरा महोत्सवाचे आयोजन
उपचार न मिळाल्याने महिलेचे निधन, दोन डॉक्टरसह तिघांवर गुन्हा 

श्रीगोंदा :- मा जिल्हापरिषद उपाध्यक्ष लोकनेते आण्णासाहेब शेलार यांचे सुपुत्र व बेलवंडी गावचे लोकनियुक्त सरपंच ऋषिकेश शेलार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सोमवार दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी आण्णासाहेब शेलार यांच्या श्रीगोंदा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ह.भ.प.बाबाजी महाराज चाळक यांच्या हस्ते करण्यात आले.

       निवडणुका जवळ आल्या की कुकडी,साकळाई, विसापूर धरणाची उंची, एमआयडीसी, रस्ते , कृषी महाविद्यालय अशा अनेक प्रश्नांवर रान उठवत निवडणुका जिंकल्या मात्र कोणत्याही प्रकारची विकासकामे श्रीगोंदा -नगर मतदार संघात झाली नाहीत. ना दळणवळण वाढले ना रोजगार उपलब्ध झाला. शेजारील तालुक्यातील विकास होत असताना आपला तालुका मात्र मागे राहिला. मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना अनेक विकासकामे कसलीही टक्केवारी न घेता मार्गी लावली.मात्र टक्केवारीत गुंतलेल्या लोकप्रतिनिधीमुळे विकास झाला नाही . आम्हाला कोणताही राजकीय वारसा नाही.मी गरीब माणूस आहे माझी कोणतीही शैक्षणिक संस्था आणि कारखाना नसल्याने माझ्या मागे कसलाही व्याप नाही.मी ३६५दिवस सदैव आपल्यासाठी उपलब्ध आहे.एकदा निवडुन द्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. मी उमेदवारीसाठी राजकीय पक्षाकडे जाऊन आलो असुन चिन्हही निश्चित झाले आहे मात्र आता चिन्ह सांगणार नाही. संपुर्ण मतदार संघाचा दौरा करून ना भुतो ना भविष्य असा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आण्णासाहेब यांनी यावेळी सांगितले.

तेच तेच प्रश्न उपस्थित करुन निवडणुका जिंकुन जनतेची दिशाभूल केली जाते शेजारील तालुके पाहिले तर त्या ठिकाणचे प्रश्न जवळपास सुटलेले आहेत आर्थिक सुबत्ता आली आहे रोजगाराचे प्रश्न सुटले आहेत दळणवळण वाढले आहे परंतु श्रीगोंदा तालुक्यातील प्रश्न जसेच्या तसे आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक आम्ही हातात घेण्याचे ठरविले आहे त्यासाठी आपली साथ हवी आहे असे ऋषिकेश शेलार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या उद्घाटन कार्यक्रमासाठी साजन पाचपुते, अनिल ठवाळ, एमडी शिंदे, शरद जमदाडे, कांतीलाल कोकाटे, संतोष रोडे, सोमनाथ घाडगे, सुभाष काळाणे, साहेबराव रासकर, वाल्मिक खेडकर, , रामराव खामकर, राजू गोरे, असिफ शेख, ओंकार शिंदे यांच्या सह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांसठी वेळ आली तर दोन पावले मागे जाण्याची माझी तयारी असते, आपल्या दोघांच्याही वडिलांचे तालुक्यात मोठे काम आहे. तुझ्या सारख्या निर्व्यसनी चांगल्या विचारांच्या तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे ऋषिकेश तुला कधीही माझी मदत लागली तर मी मदतीला उभा राहील – साजन पाचपुते

COMMENTS