Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री तुकाराम महाराज पादुका चोरी करणारा आरोपी जेरबंद

पुणे ः पुणे शहरातील विविध भागातील मंदिरातील दानपेटी उचकटून रोख रक्कम चोरणार्‍या चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. चोरट्याने अल्पवयीन साथीदारा

संगमनेर शेतकी संघ राज्यात प्रथम क्रमांकाचा ः थोरात
साधुच्या वेशात येऊन 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार
कोपरगावमध्ये डिझेल चोरी करणारे जेरबंद

पुणे ः पुणे शहरातील विविध भागातील मंदिरातील दानपेटी उचकटून रोख रक्कम चोरणार्‍या चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. चोरट्याने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीन दानपेटी फोडण्याचे चार गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्याने दोन आठवड्यापूर्वी फर्ग्युसन रस्त्यावरील श्री तुकाराम महाराज पादुका मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरल्याचे उघडकीस आले. साहिल अशोक माने (वय 19, रा. इंदीरा गांधी वसाहत, औंध रस्ता, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नारायण पेठेतील प्रगतीशील मित्र मंडळ गणपती मंदीरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी 11 हजारांची रक्कम चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली होती. गुन्हे शाखेच्या युनिट एककडून तपास करण्यात येत होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले होते. दानपेटी फोडून पसार झालेले चोरटे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले होते. आरोपींच्या वाहन क्रमांकाच्या पाटीवरुन पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता.

COMMENTS