Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

बीड प्रतिनिधी - सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती बीड शहरामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त महाराज

अपहरण केलेल्या महिलेवर सलग पाच दिवस अत्याचार
पैशाच्या वादातून मालकानेच केली नोकराची हत्या.
चोराने देवाला दंडवत घालून नंतर केली चोरी | LOK News 24

बीड प्रतिनिधी – सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती बीड शहरामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त महाराजांची मूर्ती अभिषेक करण्यात येऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले. याचबरोबर मंदिर परिसरात वृक्षांचे रोपण करण्यात आले.
सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे श्रावण शुद्ध नवमी शुक्रवार दि. 25 ऑगस्ट रोजी बीड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त सकाळी चि. संकेत सतीशराव बेदरे यांच्या हस्ते महाराजांचा अभिषेक आणि पूजा करण्यात आली. याप्रसंगी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रणेते ड. संदीप बेदरे यांची उपस्थिती होती. दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा सिनेट सदस्य अ‍ॅड. सुभाष राऊत आणि जयंती महोत्सवाचे संस्थापक तथा प्रणेते ड. संदीप बेदरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी समता परिषदेचे युवा नेते नितीन राऊत यांच्यासह रामेश्वर(बाबू) राऊत, विकास राऊत, सार्थक शेंडगे आदींची उपस्थिती होती.

COMMENTS