Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रेने मोडला गर्दीचा उच्चांक

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः देवळाली प्रवरा येथील श्री. समर्थ बाबुराव पाटील महाराज याञा उत्सवात या वर्षी गर्दीने उच्चांक मोडला. तर याञा उत्सवात कोट

निळवंडेच्या उजव्या कालव्यातून मिळणार पाणी
१० वी १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग, संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक | DAINIK LOKMNTHAN
अखेर रत्नदीपचे डॉ. भास्कर मोरेंवर दुसरा गुन्हा दाखल

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः देवळाली प्रवरा येथील श्री. समर्थ बाबुराव पाटील महाराज याञा उत्सवात या वर्षी गर्दीने उच्चांक मोडला. तर याञा उत्सवात कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली. कुस्ती हगामात अनेक मल्लांनी सहभाग नोंदविला या वर्षाची समर्थ बाबुराव पाटील चांदीची गदा सलग पाचव्यांदा नगर येथील अक्षय पवार याने बारा हजाराच्या बक्षीसासह पटकविली.
राहुरी येथील पप्पु बर्डे याचा पराभव करताना निर्णायक कुस्ती करण्यात आली. द्वितीय क्रमांक चांदीची गदा व सात हजाराचे रोख बक्षिस येवला येथिल रोहन परदेशी याने तर तृतीय क्रमांक राहुरी तालुक्यातील प्रिंप्रीवळण येथिल विकास डमाळे यांनी पटकावला आहे.भाविकांनी याञा उत्सवाचा आनंद घेतला.पोलिस डोळ्यात तेल घालुन बंदोबस्त ठेवल्याने महिला व मुलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे लांबविणार्‍या तीन महिलांना ताब्यात घेवुन गुन्हा दाखल केल्याने याञा उत्सवात होणारी लुटमार थांबल्यामुळे पोलिस प्रशासनाचे महिलांनी आभार मानले. श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज याञा  उत्सव मोठ्या प्रमाणात गर्दीने उच्चांक मोडला. त्याच प्रमाणे खेळणी व इतर साहित्य विक्री करणार्‍या विक्रेत्यांची संख्या दुप्पट दिसुन आल्याने अनेक दुकानदारांना दुकान लावण्यास जागा मिळाली नाही. अनेक दुकानदारांनी रस्त्याच्या कडेला दुकाने लावल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण झाले होते.
             यात्रा उत्सवाची सुरवात शनिवारी ह.भ.प.निवृत्ती समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनाने झाली. रविवारी सकाळी गंगाजलची मिरवणुक शहरातुन काढण्यात आली. खा. डॉ. सुजय विखे यांनी धावती भेट देवुन दर्शन घेतले.सायंकाळी ह.भ.प. महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते पादुका व पालखी पुजन करुन छबिना मिरवणूकीस प्रारंभ झाला. यावेळी करण ससाणे, सचिन गुजर, गणेश भांड, शिवअप्पा कपाळे, यात्रा उत्सवात सहभागी झालेल्या बँण्ड पथकाने देवळालीकरांची मने जिंकल्याने बँड पथकास मोठा प्रतिसाद मिळाला. शोभेची आतिषबाजी मध्ये बेलापूर येथिल फिरोज शेख, वांबोरी येथिल परवेज शेख, संगमनेर येथील बी. एस. फायर वर्क्सचे जैहुरभाई आदींनी आकर्षक आतिषबाजी केल्याने भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कुस्त्यांचा हंगामात अनेक मल्लांनी (पैलवान) यांनी सहभाग घेतला राहुरीचे पप्पु बर्डे व अहमदनगरचा अक्षय पवार यांची निर्णायक कुस्ती झाली.या सामन्यात अक्षय पवार याने पप्पु बर्डे यास चिटपट करुन सलग पाचव्या वर्षीही चांदीच्या गदेचा मानकरी ठरला आहे.पंधरा हजाराचे रोख बक्षिस हि त्याने पटकवले आहे.द्वितीय क्रमांक चांदीची गदा व सात हजाराचे रोख बक्षिस येवला येथिल रोहन परदेशी याने तर तृतीय क्रमांक ढाल व रोख पाच हजाराचे पारीतोषीक राहुरी तालुक्यातील प्रिंप्रीवळण येथिल विकास डमाळे यांनी पटकावले.या कुस्तीचे वैशिष्ट म्हणजे विकास डमाळे हा 65 किलो वजन गटातील असतानाही अकाश चव्हाण या 80 कीलो वजनाच्या मल्ला बरोबर लढात देवुन चपळाईने कुस्ती निकाली काढीत चव्हाण यास चितपट केले. तुमच्यासाठी कायपण या लावण्याचा बहारदार कार्यक्रमात दुरंगी सामन्याचा रसिकांनी आनंद लुटला.

COMMENTS