Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरात ‘श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज’ यात्रोत्सव

देवळाली प्रवरा : श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रोत्सवाचे आयोजन शनिवारी दि. १४ मार्च ते मंगळवार दि. १८ मार्च २०२६ या कालावधीत करण्यात आले असून विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांसाठी उपलब्ध होणार आहे.  शनिवार दि. १४ मार्च रोजी सकाळी १० वाजता समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन होणार असून सायंकाळी भाविक गंगाजल आणण्यासाठी पुणतांबाकडे प्रस्थान करणार आहेत. रविवार दि. १५ मार्च रोजी सायंकाळी संगीत भजन संध्या,. सोमवार दि. १६ मार्च रोजी सकाळी ६ वाजता बॅण्ड पथक व ढोल-ताशांच्या गजरात कावड मिरवणूक व गंगास्नान होणार आहे. दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत भव्य पालखी मिरवणूक पार पडणार असून महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते पालखी पूजन होईल. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मंगळवार दि. १७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता महाराष्ट्रातील नामांकित मल्लांच्या उपस्थितीत कुस्त्यांचा  हगामा रंगणार आहे. बुधवार दि. १८ मार्च रोजी रात्री ९ वाजता लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी यात्रा उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन यात्रा समितीचे अध्यक्ष विश्वास पाटील, कार्याध्यक्ष कुणाल पाटील, उपाध्यक्ष मेजर राजेंद्र कडू, तुळशीराम कडू, उपकार्याध्यक्ष नारायण कडू, उत्तम पाटील, गणेश भांड, सचिव सुखदेव होले, शिवराम कडू, मुस्ताक शेख, भारत शेटे, धनंजय शिंदे, अनिल ढुस, यश धाकतोडे, खजिनदार दीपक पठारे, बापू कडू, राजेंद्र पोकळे, सचिन सरोदे तसेच मंदिर व्यवस्थापनाचे गजानन येवले, रंगनाथ होले, अशोक शिंदे व भिमराज चव्हाण यांनी केले आहे.

संवत्सर महानुभाव आश्रमाच्या विकास कामांना मान्यता
कृषी संकल्प उत्तम; पण ‘कायाकल्प किती होणार’? : डॉ. मुळीक 
धरणात बुडून युवकाचा मृत्यू

देवळाली प्रवरा : श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रोत्सवाचे आयोजन शनिवारी दि. १४ मार्च ते मंगळवार दि. १८ मार्च २०२६ या कालावधीत करण्यात आले असून विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांसाठी उपलब्ध होणार आहे. 

शनिवार दि. १४ मार्च रोजी सकाळी १० वाजता समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन होणार असून सायंकाळी भाविक गंगाजल आणण्यासाठी पुणतांबाकडे प्रस्थान करणार आहेत.

रविवार दि. १५ मार्च रोजी सायंकाळी संगीत भजन संध्या,. सोमवार दि. १६ मार्च रोजी सकाळी ६ वाजता बॅण्ड पथक व ढोल-ताशांच्या गजरात कावड मिरवणूक व गंगास्नान होणार आहे. दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत भव्य पालखी मिरवणूक पार पडणार असून महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते पालखी पूजन होईल. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मंगळवार दि. १७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता महाराष्ट्रातील नामांकित मल्लांच्या उपस्थितीत कुस्त्यांचा  हगामा रंगणार आहे. बुधवार दि. १८ मार्च रोजी रात्री ९ वाजता लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी यात्रा उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन यात्रा समितीचे अध्यक्ष विश्वास पाटील, कार्याध्यक्ष कुणाल पाटील, उपाध्यक्ष मेजर राजेंद्र कडू, तुळशीराम कडू, उपकार्याध्यक्ष नारायण कडू, उत्तम पाटील, गणेश भांड, सचिव सुखदेव होले, शिवराम कडू, मुस्ताक शेख, भारत शेटे, धनंजय शिंदे, अनिल ढुस, यश धाकतोडे, खजिनदार दीपक पठारे, बापू कडू, राजेंद्र पोकळे, सचिन सरोदे तसेच मंदिर व्यवस्थापनाचे गजानन येवले, रंगनाथ होले, अशोक शिंदे व भिमराज चव्हाण यांनी केले आहे.

COMMENTS