Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री नागेश विद्यालयाचे नाव झळकले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये

जामखेड/प्रतिनिधी ः देशातील सर्वात मोठे मानवी रचनेतील प्रजासत्ताक दिन नाव रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयाने साकारले आहे. त्यामुळे श्री

पाथर्डी तालुक्यातील येळीमध्ये भरदिवसा दरोडा
कोपरगावमध्ये ब्रम्हगौरव गुणगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात
धोत्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आरती जामदार

जामखेड/प्रतिनिधी ः देशातील सर्वात मोठे मानवी रचनेतील प्रजासत्ताक दिन नाव रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयाने साकारले आहे. त्यामुळे श्री नागेश विद्यायाचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदले गेले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मेडल प्रमाणपत्र सन्मान वितरण सोहळा नागेश विद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यामध्ये नागेश विद्यालयाचे 500 विद्यार्थी व कन्या विद्यालयाचे 500 विद्यार्थीनी असे 1000 विद्यार्थी व एनसीसी कॅडेट यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभाग घेतला हे नाव कलाशिक्षक तथा ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी साकारले. याची नोंद भारत सरकारच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड घेतली आहे.  हा उपक्रम नागेश विद्यालयाचे प्राचार्य मडके बी. के.यांच्या मार्गदर्शक व संकल्पनेतून साकार  झाला.
यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर प्रमुख उपस्थितीत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे,स्कूल कमिटी सदस्य विनायक राऊत, हरिभाऊ बेलेकर, कन्या स्कूल कमिटी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर राळेभात, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका सौ चौधरी के. डी, ग्रामसेवक जिल्हाकार्याध्यक्ष युवराज ढेरे पाटील, मुकुंद सातपुते, कृष्णाजी भोसले, पर्यवेक्षक संजय हजारे, कोकाटे व्ही के, कॅप्टन गौतम केळकर, गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, बाबासाहेब घोलप, संतोष पवार,गोपाल बाबर, शैलेंद्र मानकर, नागेश व कन्या विद्यालय सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी व एनसीसी कॅडेट आदी उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालयामुळे  जामखेडच्या वैभवात नक्कीच भर पडली आहे तसेच शाळेचे, संस्थेचे व गावाचे नाव देशपातळीवर चमकले आहे. ही बाब जामखेडकरांसाठी अभिमानास्पद आहे. जामखेडच्या वैभवात नागेश विद्यालयने मानाचा तुरा रोवला आहे. व यामध्ये सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी इंगळे तर आभार प्रदर्शन शंभूलाल बडे यांनी केले.

आमदार पवारांमुळेच प्रेरणा : मधुकर राळेभात – आमदार रोहित पवार यांनी विद्यालयात राजमाता जिजाऊ यांचे सगळ्यात मोठे रेखाचित्र साकारले आहे. त्या प्रेरणेतून शाळेचे मुख्याध्यापक व सहकार्यांच्या मनात संकल्पना आली की आपण देशभक्तीचा उपक्रम प्रजासत्ताक दिन हे नाव विद्यालयात साकार आकारावे. त्यामुळे नागेश विद्यालयाच्या नावाची  इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. या विश्‍व रेकॉर्डमुळे आपल्या शाळाने देशपातळीवर नाव नोंदवले आहे मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे म्हणून मला फार कौतुक वाटत आहे . असेच नवनवीन उपक्रम यापुढे घ्यावे असे प्रा मधूकर राळेभात यांनी सांगितले.

COMMENTS