नुकताच श्रावण महिना सुरु झाला असून, या महिन्यातील आज पहिला सोमवार. या श्रावण महिन्याचे वैशिष्टयच वेगळे आहे. हवा-हवासा वाटणारा हा महिना. या श्रावण महि
नुकताच श्रावण महिना सुरु झाला असून, या महिन्यातील आज पहिला सोमवार. या श्रावण महिन्याचे वैशिष्टयच वेगळे आहे. हवा-हवासा वाटणारा हा महिना. या श्रावण महिन्याचे सर्वच धर्मांमध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे. पावसाळा होत असताना सभोवतालचा निसर्ग हिरवागार झाल्यामुळे निसर्गाचेही दृष्य आणि वातावरण उत्साहवर्धक असते. त्यामुळे हा महिना वेगवेळ्या दृष्टीने वेचक आणि वेधक ठरतो. श्रावण महिन्याचे महत्त्व बाल कविंसारख्या कविंनी देखिल ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी उन पडे’ या शब्दांमध्ये व्यक्त केली आहे. या दोन ओळींमध्ये श्रावण महिन्याचे संपूर्ण वैशिष्ट्य सामावलेले आहे. क्षणात उन आणि पाऊस अशा दोन्ही वातावरणाची अनुभूती याच काळात येते. सभोवताली दाटलेल्या हिरवळीमुळे प्रत्येकाचे मन हर्षाने दाटलेले असते. याच काळामध्ये शेतकरी बांधवांच्या शेतातही मुग, चवळी सारखी पिके पोग्यावर आलेली असतात. बर्याच वेळा शेतामध्ये बालके मुग आणि चवळीच्या शेंगा खाण्याचा आनंद याच महिन्यामध्ये घेत असतात. उन-पावसाचा खेळ आणि त्यात आकाशातील इंद्रधनुष्य असे विहंग दृष्यांचा आनंदही बालक या काळात लुटत असतात. वृध्दत्वाकडे झुकलेल्या आवि वृध्दत्वाच्या त्रासाने व्याकुळ झालेल्या ज्येष्ठांच्या बहुतांश धार्मिक यात्राही याच काळात होत असतात. तर कर्तीसवरती माणसे या महिन्यात आपल्याकडून होईल तेवढे चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करतात. एकंदरीत सारा भारतच या काळात कुशल कर्मासाठी झटत असतो. एरव्ही काही वर्षांपासून निसर्गाच्या पालटणार्या स्वरुपामुळे श्रावण महिन्याच्या वैशिष्ट्यालाही दृष्ट लागल्यासारखे झाले आहे. मात्र आता निसर्गाचे स्वरुपच बदलत असल्याने पूर्वीचा तो अनुभव आता जसाच्यातसा दृष्टीपथात येईलच असे नाही. श्रावणाच्या नंतर येणार भाद्रपदाच्या उन्हाने शेतात काम करण्याच्या धाकाने अनेकजण गृहत्याग करुन निघून जात असत. मात्र आता उन्हाची तिव्रताही जवळपास नऊ महिने जाणवत असल्यामुळे त्याविषयी फारसे त्रासाचे आणि नाविन्याचे अनुभव राहीलेले नाहीत. अर्थात हा सरळ धोपट नैसर्गिक कार्यक्रम मांडत असतांना या काळात स्त्रीयांच्या व्रतवैकल्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही. ज्या पावित्र्याने ते आपल्या धार्मिक कार्यक्रमाला जोपासत असतात त्यामुळे घरातील पुरुषांनाही त्यांच्या त्या भावनांचा आदर राखला जावा अशी भूमिका आपोआप पटायला लागते. त्यामुळे पुरुषांच्या व्यसनाधिनतेवरही या काळात बर्याच मर्यादा पडतात किंबहुना श्रावण महिना मांस आणि मद्यपानाच्या दृष्टीने तठस्थ मानला जातो. या सगळ्यांमुळेच श्रावण महिना बाल-गोपाल, महिला, वृध्द या सगळ्यांनाच हवा आहे. घरातील कर्त्या मंडळींचा काहीसा अडचणींचा महिना असल्यामुळे एकूणच वातावरणामुळे ते देखिल यात आनंदाने सामील होतात. त्यामुळे सृष्टीच्या पावित्र्याचाच हा महिना असल्यामुळे वातावरणात सगळीकडे आनंदाला उधाण असते. मात्र या महिन्याचे वैशिष्ट्य नैसर्गिकरित्या कायम असावे असे आपणांस वाटत असेल तर या महिन्यातच आपण निश्चय करावा की या पावसाळ्यात शेती, घराच्या अवती-भवती किंवा मिळेल त्या ठिकाणी किमान एका वृक्षाची लागवड करण्याचे ध्येय बाळगून ते जोपासण्याचा प्रयत्न करावा. वृक्ष लावता येत नसेल तर आपल्या परसात कीमान एक लता वेल लावून आपण या निसर्ग सृष्टीचा भाग होण्यास हरकत नाही. निसर्गाचा हा संदेश आत्मसात करुन त्याला आपण अंमलात आणला तर मानवी समाजाला एकूणच ज्या अडचणींना आणि संकटांना सामोरे जावे लागते अशी पाळी वारंवार येणार नाही आणि निसर्गाचा सन्मान राखणारा माणसाकडे पाहून निसर्गही त्याला संकतटात लोटणार नाही. हेच व्रत आपण सगळ्या या श्रावण महिन्यात मनात ठसवून अंमलात आणावे हाच या श्रावण मासाचा संदेश आहे.
COMMENTS