Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओळख लपवण्यासाठी जाळला श्रद्धाचा चेहरा

आरोपी आफताबची कबुली

मुंबई प्रतिनिधी - वसईच्या श्रद्धा वालकर खून प्रकरणात आरोपीने खूनाची कबुली दिली असली तरी, पोलिसांसमोर पुरावे शोधण्याचे मोठे आव्हान आहे. आरोपीविरो

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार : कृषी मंत्री कोकाटे
अखेर राजद्रोहाचे कलम स्थगित | DAINIK LOKMNTHAN
‘राधे श्याम’चं प्रदर्शन लांबणीवर ! LokNews24

मुंबई प्रतिनिधी – वसईच्या श्रद्धा वालकर खून प्रकरणात आरोपीने खूनाची कबुली दिली असली तरी, पोलिसांसमोर पुरावे शोधण्याचे मोठे आव्हान आहे. आरोपीविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. आरोपी आफताब पूनावालाने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. श्रद्धाच्या शरिराचे तुकडे केल्यानंतर तिचा चेहरा जाळल्याची कबुली आरोप आफताबने पोलिसांना दिली आहे. श्रद्धाची ओळख लपवण्यासाठी आरोपीने हे कृत्य केलं आहे. खूनानंतर शरिराची विल्हेवाट कशी लावायची? याबाबत इंटरनेटवरून माहिती घेतल्याचेही आरोपीने पोलिसांना सांगितले आहे.
दिल्लीत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणार्‍या श्रद्धाचा प्रियकर आफताबने सहा महिन्यांपूर्वी खून केला होता. 18 मे रोजी आफताबने श्रद्धाचा गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. खुनाच्या दुसर्‍याच दिवशी आरोपीने तिचे 35 तुकडे करुन घरातील फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर सलग 16 दिवस दिल्लीच्या मेहरोली जंगलात विविध ठिकाणी तिच्या शरीराचे अवयव फेकले. या अवयवांचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या जंगलात 10 ते 13 हाडं सापडली आहेत. ही हाडे श्रद्धाचीच आहेत का हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहेत. अद्याप श्रद्धाचे डोके सापडलेले नाही. दरम्यान, हे दाम्पत्य राहत असलेल्या छतरपूरच्या फ्लॅटच्या स्वयंपाकघरात आढळेल्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. श्रद्धाच्या सापडलेल्या अवयवांची तपासणी करण्यासाठी तिच्या वडिलांचे डीएनए नमुने घेण्यात आले आहेत. तपास यंत्रणांकडून हे दाम्पत्य राहत असलेल्या परिसराचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.

COMMENTS