Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकपात्री अभिनय स्पर्धेत श्रद्धा पुंडे व्दितीय

कोपरगांव/प्रतिनिधी : स्थानिक के.जे. सोमय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील विद्यार्थीनी श्रद्धा पुंडे हिने महाविद्यालय गटातून

अंगावर स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी
दुर्गाताई तांबे यांना आदर्श मातोश्री जीवनगौरव पुरस्कार
अत्याधुनिक ग्रेडेड मशीनद्वारे शहरातील रस्त्यांचे कामे दर्जेदार होणार – आ.संग्राम जगताप

कोपरगांव/प्रतिनिधी : स्थानिक के.जे. सोमय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील विद्यार्थीनी श्रद्धा पुंडे हिने महाविद्यालय गटातून व गिता थोरात हिने खुल्या गटातून एकपात्री अभिनय स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळविला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संकल्पना फाउंडेशन, कोपरगांव आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी संपन्न झाल्या. ही स्पर्धा शालेय, महाविद्यालय व खुल्या गटात झाली होती. त्यापैकी महाविद्यालयीन गटातून श्रद्धा पुंडे हिने व खुल्या गटातुन गिता थोरात यांनी व्दितीय क्रमांक पटकावला. त्यांना क्रमशः रोख रक्कम 701, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. खुल्या गटातुन प्रसाद चौधरी याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. प्रसादने या अगोदर माईम या कला प्रकारात मुख्य भूमिका करून विद्यापीठस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता. श्रद्धा पुंडे व गिता थोरात दोघीही महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थिनी असुन त्यांनी अनेक सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग नोंदविलेला आहे.या दोघीनाही सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.शैलेंद्र बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे,सचिव अ‍ॅड.संजीवदादा कुलकर्णी, विश्‍वस्त संदीपराव रोहमारे, प्राचार्य डॉ.बी.एस.यादव, रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS