सातारा प्रतिनिधी - सातारा शहरातील राजवाडा परिसरात गाेलबाग आहे. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास नागरिक जेवण झाल्यानंतर मसाला दूध, आईसक्रीम खाण्यासा

सातारा प्रतिनिधी – सातारा शहरातील राजवाडा परिसरात गाेलबाग आहे. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास नागरिक जेवण झाल्यानंतर मसाला दूध, आईसक्रीम खाण्यासाठी येत असतात. नेहमीप्रमाणे बुधवारी नागरिकांची गाेलबाग परिसरात वर्दळ हाेती. रात्री साडे अकराच्या सुमारास दाेन जणांनी गाेलबाग परिसरात येऊन एकावर गाेळीबार केल्याने परिसरात खळबळ उडाली.शहराच्या मुख्य परिसरात गाेळीबाराची घटना घडल्याने पाेलिस तातडीने घटनास्थळी पाेहचले. काही नागरिकांकडून पाेलिसांनी घटनेची माहिती घेतली. ही घटना पुर्वीच्या भांडणावरुन झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.या घटनेत मांढरे नामक व्यक्ती जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांना नागरिकांकडून मिळाली. दरम्यान या घटनेत आप्पा मांढरे हे जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहे.
COMMENTS