Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हार येथे आगीत दुकान जळून भस्मसात

जीवितहानी नाही, सव्वा कोटीचे साहित्य जळून खाक

कोल्हार ः राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपुर येथे प्लास्टिक फायबर च्या वस्तूची होलसेल विक्री करणार्‍या दुकानाला मंगळवारी रात्री 2.30 च्या दरम्यान

क्षयरोग निवारणासाठी तरुणांनी जनजागृती करावी
आई, ताई, बाबा, भाऊ, आजी-आजोबा मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाही सदृढ करा !
निपाणी-निमगाव ते वाटापूर रस्त्याच्या कामाला सुरूवात

कोल्हार ः राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपुर येथे प्लास्टिक फायबर च्या वस्तूची होलसेल विक्री करणार्‍या दुकानाला मंगळवारी रात्री 2.30 च्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली या आगीत कोणतीही जीवित हानी  झाली नाही मात्र संपूर्ण दुकान आगीत भस्मसात झाल्याने मोठी आर्थिक हानी झाली. याबाबत सविस्तर असे की कोल्हार येथे झुंबरलाल कुंकूलोळ व्यापारी संकुला नजीक बस स्थानकाच्या आवारात  राज्य परिवहन महामंडळाचे व्यावसायिक गाळे भाडेतत्त्वावर दिले आहेत.
या गाळ्यांमध्ये श्री ज्ञानेश्‍वर मधुकर कोळपकर यांचे प्लास्टिक फायबर युटेनशील मटेरियल व शेती उपयोगी विविध वस्तू विक्रीचे होलसेल दुकान होते या दुकानाला मंगळवारी रात्री अडीच वाजेच्या  दरम्यान अचानक आग लागली बंद दुकानातून धूर येत असल्याचे नगर मनमाड रोड लगत  चहाचे दुकान असलेल्या अमोल बोरुडे यांना दिसले त्यांनी तात्काळ कोळपकर परिवाराला भ्रमणध्वनीवरून ही माहिती दिली ज्ञानेश्‍वर कोळपकर व त्यांचा मुलगा कुणाल कोळपकर हे तात्काळ दुकानाकडे आले परंतु दुकानात असलेल्या प्लास्टिक वस्तू मुळे आगीने रौद्र रूप   धारण केले होते स्फोटासारखे आवाज झाल्याने व आरडाओरडा ऐकून संकुलातील जवळपासचे रहिवाशी  जागे झाले. व तेही घटनास्थळी मदतीकरता धावून आले काही नागरिकांनी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या फायर ब्रिगेडला फोन करून अग्निशामक गाड्या बोलून घेतल्या विखे पाटील कारखाना,गणेश कारखाना श्रीरामपूर नगर परिषद आदी ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या  फायर ब्रिगेडचे कर्मचारी व  नागरिकांनी आग विझवण्यासाठी अथक परिश्रम घेतले दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात फायर ब्रिगेड व नागरिकांना यश आले या आगीत एक कोटी दहा लाख रुपयाचे प्लास्टिक मटेरियल 10 लाख रुपयांचे फर्निचर दुकानातील लॅपटॉप प्रिंटर नोटा मोजण्याचे मशीन व रोख रक्कम दहा हजार रुपये असा एकूण एक कोटी 25 लाखाचे साहित्य आगीत जळून भस्मसात झाले घटनास्थळी कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी सरपंच एडवोकेट  सुरेंद्र खर्डे पाटील महावितरणचे कनिष्ठ अभियंता दिलीप गाढे व त्यांचे कर्मचारी कोल्हार औट  पोस्ट चे पोलीस कर्मचारी  कोल्हार बुद्रुक च्या तलाठी सुरेखा आबुज घटनास्थळी येऊन पाहणी केली तलाठी सुरेखा आबुज   यांनी सदर घटनेचा पंचनामा केला आगीचे नेमके कारण समजू शकले नाही परंतु शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी अशी घटनास्थळी चर्चा होती.

COMMENTS