मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी येत आहे. बॉलिवूडमधील ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतींदर कुमार खोसला यांनी वयाच्या ८४ व्या वर

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी येत आहे. बॉलिवूडमधील ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतींदर कुमार खोसला यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. सतींदर यांची बिरबल या नावाने अवघ्या सिनेसृष्टीत ओळख होती. मुंबईतल्या एका रुग्णालयात काल (१२ सप्टेंबर) सायंकाळी सतींदर यांची प्राणज्योत मालवली. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सतींदर यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी (१३ सप्टेंबर) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.सतींदर यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९३८ रोजी झाला असून त्यांनी अनेक हिंदी चित्रपटामध्ये विनोदी पात्रच साकारले आहे. १९६७ मध्ये मनोज कुमारच्या ‘उपकार’ चित्रपटातून सतींदर यांनी हिंदी सिनेसृष्टीमध्ये करियरची सुरुवात केली.
COMMENTS