Homeताज्या बातम्यासंपादकीय

धक्के : तीन राजकीय, एक सामाजिक!

शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळावा व्यतिरिक्त, महाराष्ट्रातील चार घटनांनी अधिक लक्ष वेधून घेतले. त्यातील, तीन राजकीय आहेत तर ‌एक संघटनात्मक

संसदेतही सडकावरचे अनुकरण!
वेगळ्या विदर्भासाठी मेख कोणती ! 
 ॲड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर : समाज बदलाच्या लढ्यात पराभूत ?

शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळावा व्यतिरिक्त, महाराष्ट्रातील चार घटनांनी अधिक लक्ष वेधून घेतले. त्यातील, तीन राजकीय आहेत तर ‌एक संघटनात्मक पातळीवर आहे. तीन राजकीय घटनांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, तो सर्वात प्रथम पंकजा मुंडे यांचा भगवान गडावरील सभेचा. पंकजा मुंडे या भाषण करताना नेहमीच आक्रमक आणि स्फोटक बोलण्याचा प्रयत्न करतात. परंतु,  राजकारण करताना त्यांची कृती मात्र नेमकी शरणांगत पत्करणारी असते. यावेळी त्यांनी राजकीय मंचावरून बोलताना “माझी माणसं आता तुम्हाला माफ करणार नाहीत,” अशा शब्दात आम्हाला त्रास देणाऱ्यांचे घर उन्हात बांधू, या शब्दांमध्ये सुनावली आहे. अर्थात, हे सर्वच बोलणं  भाजपा श्रेष्ठींपेक्षा महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांच्या कडे दिशा निर्देश करते काय? असा महाराष्ट्राच्या मनात विचार पडतो आहे. पंकजा मुंडे यांनी थेट नाव घेतले नसले तरी, त्यांची राजकीय ससेहोलपट झाली आहे. त्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि हा आवाज नेमका कोणाविरुद्ध उठवला आहे, हे त्यांनी जनतेवर जरी सोडले असले तरी, जनतेतून अधिकाधिक अंदाज मात्र फडणवीस यांच्या नावावर स्थिर होत आहे. दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग – रत्नागिरी मधून खासदार झालेले परंतु सध्या राजकारणात अधिक आक्रमक शैलीत वावरणारे नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी राजकारणातून कायमची निवृत्ती घेतल्याची घोषणा जाहीर केली आहे. अर्थात अतिशय आक्रमक कुटुंब असलेले आणि कोकणच्या राजकारणात आक्रमक नेतृत्व करणारे राणे कुटुंबीयातील एका माजी खासदाराने एकाएकी राजकीय संन्यास घ्यावा, ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याचं कारण की राणे कुटुंबीयांना सगळेच पक्ष वापरून घेत आहेत. सत्तेवर जरी ते दिसत असले तरी त्यांचा वापर इतर पक्षांच्या विरोधात आक्रमक आणि संस्कृतीबाह्य बोलण्याच्या दृष्टिकोनातून अधिक केला जातो आहे. त्यामुळे या कुटुंबातील सदस्यांच्या विषयी एकूणच समाजाची मानसिकता नकारात्मक होऊ पाहते आहे काय, 

 असा अंदाज आला म्हणून नितेश राणे यांनी संन्यास घेतला काय अशी सुप्तचरचा महाराष्ट्रातील जनतेमध्ये आता ठळकपणे होऊ लागले आहे. तर, तिसऱ्या बाजूला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री आणि अनेक वेळा सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे सुशील कुमार शिंदे यांनी राजकीय निवृत्ती जाहीर करण्याबरोबरच सोलापूर मतदारसंघातून प्रणिती शिंदेच आता प्रतिनिधित्व करेल, असं सुतवाच करून एक प्रकारे २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पहिला उमेदवार ठरला, असे यातून सूचित होते. अर्थात, प्रणिती शिंदे यांनाच काँग्रेस तिकीट देणार आहे काय, हा भाग अजून ठरायचा असला तरीही त्यांचे नाव जवळपास निश्चित राहील. हा मात्र विश्वास महाराष्ट्रातील जनतेला वाटतो आहे. या तीन राजकीय घटनांबरोबर चौथी एक संघटनात्मक आणि सांस्कृतिक पातळीवर घडलेली घटना म्हणजे नेहमीप्रमाणे दसरा निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख यांचे भाषण. या भाषणात मोहन भागवत यांनी जाती व्यवस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानत नाही असे सांगून एकूण समरसतेची रचना पुन्हा उद्धृत केली आहे. परंतु, एकंदरीत भारतीय समाजाला जातीव्यवस्था मुक्त करण्याचा ते कार्यक्रम देत नाही. त्याऐवजी जाती-जातींचा समन्वय वाढवून समरसता निर्माण करण्याचा म्हणजेच जाती-अबाधित ठेवून, जातींचे एकमेकांशी संबंध निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात. जे भारतीय समाजात वास्तव नाही. किंबहुना अशा प्रकारची रचना ही भारतीय समाजाने खूप आधीच नाकारली आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी उभारण्याचा हा प्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघ चालकांच्या भाषणातून पुन्हा एकदा दिसून येतो. एवढेच त्याविषयी म्हणता येईल!

COMMENTS