Homeताज्या बातम्यासंपादकीय

मोदींची धक्कादायक मुलाखत !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात कोणत्याही प्रसारमाध्यमाला मुलाखती दिल्या नाहीत, असा आरोप त्यांच्यावर सातत्याने केला जातो. परंतु, क

झुकणारे पाहणी अहवाल !
माणसाला गुलाम करणारा बाजार !
जनगणनेच्या अभावाने !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात कोणत्याही प्रसारमाध्यमाला मुलाखती दिल्या नाहीत, असा आरोप त्यांच्यावर सातत्याने केला जातो. परंतु, काल त्यांनी थेट गंगा नदीतून क्रूझमध्ये एका महिला पत्रकाराला मुलाखत दिली. या मुलाखतीतही त्यांनी नेहमीप्रमाणे एक्स्लुजिव विधाने केली. लोकसभा निवडणूक सुरू झाल्यापासून हिंदू-मुस्लिम असा भेद सातत्याने आपल्या निवडणूक प्रचारात करणारे मोदी, काल आपल्या मुलाखतीत म्हणतात की, हिंदू-मुस्लिम करणं हा माझ्या सार्वजनिक जीवनाचा भाग नाही. मोदींचं हे वक्तव्य देशातील जनतेने आश्चर्यकारक पद्धतीने घेतले आहे. परंतु, एवढ्या मोठ्या पदावर असलेली व्यक्ती आणि निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून वावरणारी व्यक्ती, सहजासहजी असे विधान करणार नाही. त्या विधानामागे निश्चितपणे काही अर्थ लपलेला आहे का, हे जर आपण पाहायला गेलो तर, निश्चितपणे असं म्हणता येईल की, हिंदू-मुस्लिम हीच विचारसरणी आहे; हे खास करून संघ आणि भाजप यांची एक संयुक्त विचारसरणी आहे! परंतु, वर्तमान लोकसभा निवडणुकीत मोदींना असं वाटतं की, ते एकाकी पडले असावेत आणि त्यामुळे निवडणूक काळात हिंदू-मुस्लिम विभाजनाचा प्रश्न हा माझा नाही, असा प्रत्यक्ष त्यांनी संदेश दिला. तर, त्या मागील अप्रत्यक्ष संदेश म्हणजे हिंदू-मुस्लिम असा भेद मग नेमका निर्माण कोणी केला? याचाच अर्थ भारतीय जनता पक्षावर अप्रत्यक्ष आरोप जातो आहे का, याही दिशेने यावर विचार करावा लागेल. मोदी कोणत्याही सभेत बोलताना आक्रमक बोलत असले तरी, त्यांच्या भाषणातील मुद्दे आता एस्क्लुजिव न ठरता वारंवार तेच ते मुद्दे येत आहेत.

परंतु, कालची त्यांची मुलाखत  मात्र त्याच मुद्द्याला उलट करणारी आहे! त्याचबरोबर ४ जूनला नेमकं काय होईल असा प्रश्नही त्या महिला पत्रकारांनी विचारला आहे. त्यावेळी ४ जून नंतर आपण पुन्हा भेटू असे आश्वासन मोदींच्या तोंडून निघत नाही! याचा अर्थ, आगामी काळात जे निकाल बाहेर येतील, त्याविषयी स्वतः मोदी देखील साशंक आहेत का? तर दुसऱ्या बाजूला  मोदी आणि शहा या जोडीतील अमित शहा हे पश्चिम बंगाल मध्ये गेल्या दोन दिवसात ज्या महासभा घेत आहेत, त्या महासभांमधून मुस्लिमांच्या विरोधातलं आक्रमण आपल्या भाषणातून त्यांनी अधिक उग्र केल्याचं दिसत आहे. त्यामुळे मोदी आणि शाह एकाच वेळी अशा दोन बाबी जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांनी ते ठरवून घेतले आहे की, एक विरोधाभास निर्माण करून चर्चेत आहेत, असा काही त्या मागचा नियोजनाचा भाग आहे का! या सगळ्या गोष्टी या निमित्ताने विचारात घ्यायला हव्या. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील का, हा प्रश्न देखील त्या महिला पत्रकाराने विचारला होता. त्यावर नरेंद्र मोदी असे उत्तर देतात की, तुम्हाला यात काही शंका आहे का? देशामध्ये सरकार बदलण्याची चर्चा होत असताना, मोदींनी असा आत्मविश्वास व्यक्त करणे  यामागे नेमकी काय कारण आहेत, हे देखील त्यानिमित पाहणे गरजेचे आहे. या निवडणुकीत नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत, असा प्रचार सातत्याने विरोधी पक्षाने केला आहे. त्यासाठी पक्षांतर्गत देखील संघर्ष निर्माण झाल्याची कारणे सांगितली जात आहेत. परंतु, अद्यापही भारतीय जनता पक्षावर मात्र मोदी-शहा यांची पकड घट्ट आहे. अशा वेळी तर सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पक्ष ४ जून नंतर समोर आला तर, पंतप्रधान पदासाठी राष्ट्रपतीकडून त्यांनाच बोलवून घेण्याची व्यवस्था केली जाईल. मात्र, बहुमत नसेल आणि केवळ सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल तर, अशावेळी पक्षांतर्गत संघर्ष देखील तीव्र होऊ शकतो. त्यामुळे सत्तेची सुंदोपसुंदी नेमकी मोदींच्या हातून जाईल की, भाजपाच्याही हातून जाईल, हा भाग आगामी काळात लवकर स्पष्ट होईल. ४ जून नंतर देशाच्या निवडणुकीची सर्व चित्र स्पष्ट होतील आणि त्यानंतर देशाचं राजकारण हे नेमकं कोणत्या दिशेने जाईल, यासंदर्भात देखील अनेक बाबी स्पष्ट होतील. मोदींची गंगा किनारी क्रूज वर झालेली मुलाखत ही काही मिनिटांची असली तरी ती, मोदींच्या राजकारणाचा परिणाम पक्षावर करण्याच्या दृष्टीने ती झाली आहे का, याही बाबतीत याचा विचार करणे महत्त्वाच आहे.

COMMENTS