Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

https://youtu.be/3ZmRezqITxE?si=SIfZV3dGHRJGmlEm सुपा : अध्यात्म आणि संस्काराचे धडे देणाऱ्या वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजन

पारनेरमध्ये कीर्तनकाराचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
तारकेश्वर गडाचे महंत अदिनाथ महाराजांनी स्वतःवरच केले वार; रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात ; डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया ; प्रकृती स्थिर
कृषी संकल्प उत्तम; पण ‘कायाकल्प किती होणार’? : डॉ. मुळीक 

सुपा : अध्यात्म आणि संस्काराचे धडे देणाऱ्या वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उघडकीस आली आहे. श्री दुर्गादिवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीला गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून हा प्रकार सुरू होता. आरोपी यशवंत थोरात व  पीडितेच्या कुटुंबांचे घरोब्याचे संबंध होते. पीडितेच्या भावाचीही महाराजांशी सलगी होती. याचाच फायदा घेऊन आरोपीने 2021 पासून पीडितेवर वाईट नजर ठेवली होती. तिच्यावर अत्याचार केले. पारनेर पोलिसांनी याप्रकरणी यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पारनेर येथील पोलीस अधिकारी करत आहेत.

COMMENTS