Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरच्यांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेमी युगुलांचे धक्कादायक कृत्य

प्रियसीचा झाला मृत्यू तर प्रियकराची मृत्युशी झुंज

नागपूर प्रतिनिधी  : प्रेमी युगुलाच्या प्रेम प्रकरणाला घरच्यांनी विरोध केल्यामुळे टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घ

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकाचा आत्महत्येचा प्रयत्न
कॉलेजच्या दुसऱ्या माळ्यावरून विद्यार्थिनीने मारली उडी
बेकायदा गाळ्याविरोधात ग्रामस्थाचा पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर प्रतिनिधी  : प्रेमी युगुलाच्या प्रेम प्रकरणाला घरच्यांनी विरोध केल्यामुळे टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपूर मधील रामटेक येथे घडली आहे. प्रेमी युगुलांच्या प्रेमाला कुटुंबियांनी विरोध करत त्यांच्या लग्नाला नकार दिला होता. कुटुंबियांना या दोघांचं प्रेमप्रकरण मान्य नसल्यामुळे या प्रेमी युगुलाने विष प्राषण करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अश्विनी उईके आणि अरुण कोडवते अशी या प्रेमी युगुलाचे नाव आहेत. या दोघांनी विष प्राषण केल्यानंतर अश्विनीचा मृत्यू झाला आहे. तर प्रियकर अरुणची मृत्युशी झुंज सुरू आहे. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

COMMENTS