नवी दिल्ली प्रतिनिधी :- शिवसेना नेमकी कुणाची याचे उत्तर अखेर शनिवारी उशीरा रात्री निवडणूक आयोगाने देत, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे
नवी दिल्ली प्रतिनिधी :- शिवसेना नेमकी कुणाची याचे उत्तर अखेर शनिवारी उशीरा रात्री निवडणूक आयोगाने देत, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा शिवसेनेसह उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray)ना मोठा धक्का आहे.
उद्धव ठाकरेंना यापुढे धनुष्यबाण चिन्ह तसेच शिवसेना नाव वापरण्यास देखील निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. याविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही गटांना केवळ शिंदे गट आणि ठाकरे गट संबोधण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. आमच्याकडे बहुमत असल्यामुळे धनुष्यबाणासह शिवसेनेवर आमचा हक्क असल्याचा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे. यासंदर्भात शिंदे गट आणि शिवसेनेने आपले प्रतिज्ञापत्र आणि पुरावे निवडणूक आयोगासमोर सादर केले होते. त्यानंतर निवडणूक आयोग यासंदर्भातील निर्णय सोमवारी घेईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र शनिवारीच निवडणूक आयोगाने मॅरेथान बैठक घेत, उशीरा रात्री हा निर्णय जाहीर केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला धनुष्यबाण चिन्हाबाबत शनिवारी लेखी उत्तर सादर केले. त्यानंतर निवडणूक आयोग कार्यालयात तब्बल चार तास हायव्होल्टेज बैठक झाली. अंधेरी पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या गटाचा उमेदवार नाही, मग धनुष्यबाण चिन्ह का मागितले जाते? असा मुख्य मुद्दा ठाकरेंनी आयोगाकडे उपस्थित केला होता. 14 ऑक्टोबर ही अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्यामुळे धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय घेण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर निवडणूक आयोगाने उशीरा रात्री निर्णय घेत धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.
COMMENTS