Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवाजी महाराजांनी ईडीसारखी सक्तीची वसुली केली

गोविंददेव गिरी महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या सूरत लुटीवरून अनेक वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरू झाली असून, आता स्वामी गोविंददेव गिरी महार

समताच्या शिबिरात 73 रक्तदात्यांनी केले रक्तदान
अखेर कचरा डेपोचे कुलूप पालिकेनेच तोडले
आ. संग्राम जगतापांसह त्या पाच मुलांना मांडावे लागणार म्हणणे…

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या सूरत लुटीवरून अनेक वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरू झाली असून, आता स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनीही यासंबंधी एक वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी काही लोकांकडून आताच्या ईडी सारखी सक्तीची वसुली केली, असे ते म्हणालेत. त्यांच्या याविधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सूरतेची लूट केली नसल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह अनेकांनी आक्षेप घेतला. त्यानंतरही फडणवीस यांनी आपण आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे ठणकावून सांगितले. यामुळे राज्याचे राजकारण तापले असताना आता श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी छत्रपती शिवरायांच्या सूरत लुटीविषयी एक वेगळेच विधान केले आहे. गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण राज्य हिंदूंचे आहे असे मानून राज्य करत होते. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेवेळी महाराजांना आर्थिक चणचण भासत होती. त्या स्थितीत जेव्हा त्यांना कोणताही उपाय दिसत नसे, तेव्हा ते आज ज्या प्रकारे ईडी सक्तीची वसुली करते, त्याच प्रकारे ते त्याकाळी काही लोकांकडून सक्तीची वसुली करत होते. हिंदी स्वराज्यासाठी जो कर भरायला हवा होता, त्याची वसुली महाराज सक्तीने करत होते. गोविंददेव गिरी महाराजांच्या या विधानामुळे शिवाजी महाराजांच्या सूरत लुटीच्या वादाला नव्याने फोडणी मिळाली आहे.

COMMENTS