Homeताज्या बातम्यामनोरंजन

शिव ठाकरे बिग बॉसमधून बाहेर ?

मुंबई प्रतिनिधी - सध्या 'बिग बॉस 16' अंतिम टप्प्यात आला असून शोच्या फिनालेसाठी अवघे काही दिवसच आता शिल्लक राहिले आहे. दरम्यान, फिनालेमध्ये को

माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू
शिंदे-फडणवीस सरकारने कामांना स्थगिती देऊन काय मिळवले
महाविद्यालयीन युवकाशी अनैसर्गिक संबंध ठेवल्याप्रकरणी हावलदाराविरुध्द गुन्हा दाखल

मुंबई प्रतिनिधी – सध्या ‘बिग बॉस 16’ अंतिम टप्प्यात आला असून शोच्या फिनालेसाठी अवघे काही दिवसच आता शिल्लक राहिले आहे. दरम्यान, फिनालेमध्ये कोण पोहोचणार आणि त्याआधी कोण घराबाहेर पडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वांनाच कमालीची उत्सुकता आहे. दरम्यान, शोच्या फिनालेपूर्वी शिव ठाकरे घराबाहेर पडण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. इतकंच नाही तर काही दिवसांपुर्वी करण जोहरने शिव ठाकरेला एलिमिनेट करण्याचा इशारा ही दिला होता. आजच्या भागामध्ये करण जोहर एकमेकांच्या बॉन्डिंगबद्दल स्पर्धकांशी संवाद साधणार आहे.

यावेळी करण जोहर सुंबूल तौकीर खानलाही तिच्या वागणुकीमुळे सोबतच शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनला नॉमिनेट का करण्यात आले याचे कारण स्पष्ट करायला सांगणार आहे. आजच्या भागात, करण स्पर्धकांना देखील प्रश्न करणार आहे की ते खरोखर चांगले मित्र आहेत की ते फक्त पैशांसाठी एकत्र आहेत? या सर्वांवर प्रश्न विचारत शिव म्हणतो, “घरातील एका सदस्याने चूक केली तर त्याला सर्व सदस्य समजावून सांगतात, कारण ते खूप दिवसांपासून एकत्र आहेत.” त्याचवेळी करण शिवला आणखी एक प्रश्न विचारतो, “जर घरातील एक सदस्य तुटला तर त्याला जबाबदार कोण असेल?” यासोबतच निमृत कौरनेही शोमध्ये करण जोहरला प्रत्युत्तर देत म्हणाली की, हे स्पर्धक कधीही तुटणार नाहीत. निमृतच्या या उत्तरावर करण म्हणतो, “आज एक व्यक्ती हे घर सोडून जाईल.”आणि नंतर शिव ठाकरेकडे बोट दाखवत करण म्हणतो की, त्याला सर्वात कमी मते मिळाली आहेत. हे ऐकून शिव बाहेरच्या दरवाजाकडे जातो.

COMMENTS