शिवसेनेचा पाय आणखी खोलात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेचा पाय आणखी खोलात

खासदारही बंडखोरीच्या मार्गावर ; शिवसेनेच्या बैठकीला अनेक खासदार अनुपस्थित

मुंबई/प्रतिनिधी : शिवसेनेला लागलेले बंडाचे ग्रहण अद्यापही सुटण्याची चिन्हे नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 पे

मुंबईचा स्वच्छता पॅटर्न राज्यभर राबवणार ः मुख्यमंत्री शिंदे
मुळ असलेली गाठ काढतांना वाचविले फुफ्फूस
कृषीदिनी राज प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ शेतकर्‍यांचा सत्कार

मुंबई/प्रतिनिधी : शिवसेनेला लागलेले बंडाचे ग्रहण अद्यापही सुटण्याची चिन्हे नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 पेक्षा अधिक आमदार आपल्यासोबत घेऊन गेल्यानंतर आता शिवसेनेतील खासदार देखील बंडखोरीच्या मार्गावर असल्यामुळे शिवसेनेचा पाय आणखी खोलात जातांना दिसून येत आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा, यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला 18 पैकी अनेक खासदार अनुपस्थित असल्यामुळे खासदारही बंडखोरीच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या बैठकीत केवळ 10 ते 12 खासदारांचीच उपस्थिती असल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवेसेनेत मोठी फूट पडली होती. अखेर अल्पमतात आलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिंदे गटाने भाजपासोबत युती करुन सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदी तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली. आता आमदारांनतर शिवसेनेचे खासदारही एकनाथ शिंदेच्या संपर्कात असून बंडखोरी करण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली ही बैठक महत्वाची मानली जात आहे. या बैठकीला गजानन कीर्तिकर (मुंबई नॉर्थ वेस्ट), अरविंद सावंत (दक्षिण मुंबई), विनायक राउत (रत्नागिरी- सिंधुदुर्ग), धैर्यशील माने (हातकणंगले), हेमंत गोडसे (नाशिक), राहुल शेवाले (दक्षिण मध्य मुंबई), श्रीरंग बारणे (पिंपरी चिंचवड) प्रताप जाधव (बुलढाणा), सदशिव लोखंडे (शिर्डी) आदी खासदार उपस्थित होते.
दरम्यान, आमदार अपात्रतेसंदर्भातील खटला ते आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्ही बाजूने झाडल्या जात असतानाच 40 आमदारांचा पाठिंबा असणार्‍या एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यानंतरही न्यायलयीन लाढाई आणि आरोप प्रत्यारोप सुरु असून याचदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या सत्तासंघर्षामध्ये त्यांच्या पाठिशी असणार्‍या शिवसेनेच्या 15 आमदारांना एक विशेष पत्र पाठवले आहे. शिवसेनेसोबत असणारे आणि उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारे आमदार रविंद्र वायकर यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंनी पाठवलेलं हे पत्र शेअर केलं आहे. या पत्रामध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आठवण करुन देत शिवसेनेसोबत राहिल्याबद्दल आमदारांचे आभार मानतानाच कोणत्याही प्रलोभनांना आणि धमक्यांना बळी न पडल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

बैठकीत गैरहजर खासदार
कलाबेन डेलकर (दादरा-नगर हवेली), राजन विचारे (ठाणे), कृपाल तुमाने (रामटेक), श्रीकांत शिंदे (कल्याण-डोंबिवली), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद), हेमंत पाटील (हिंगोली), संजय मांडलिक (कोल्हापूर), हेमंत जाधव (परभणी), राजेंद्र गावित (पालघर), भावना गवळी (यवतमाळ-वाशिम)

धनुष्यबाणासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेनेचे पक्ष चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरुन संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. यापार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेत कॅव्हेट दाखल केले आहे. भाजपसोबत जात एकनाथ शिंदे गटाने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. यानंतर आता शिंदे गट शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर दावा सांगण्याची शक्यता आहे, या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडें धाव घेतली आहे. आपली बाजू ऐकल्याशिवाय धनुष्यबाण या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ नये, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

COMMENTS