Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या संजय कोरे यांना शिवसेनेची दारे खुली : सागर मलगुंडे

राष्ट्रवादीला विचारात घेऊन प्रभाग रचना….सध्या इस्लामपूर पालिकेची केलेली प्रभाग रचना ही मुख्याधिकार्‍यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कशी फायदेशी

इस्लामपुरात राज्यपाल कोश्यारींच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन; पुरोगामी समविचारी पक्ष संघटनेच्या वतीने निषेध
कराड शहरात टोळी युध्दातून एकावर खूनी हल्ला
कराड येथील महिलेच्या खूनाचा उलगडा

राष्ट्रवादीला विचारात घेऊन प्रभाग रचना….
सध्या इस्लामपूर पालिकेची केलेली प्रभाग रचना ही मुख्याधिकार्‍यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कशी फायदेशीर ठरेल. याचा विचार करून राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांना विचारात घेऊन ही प्रभाग रचना केली असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक शकील सय्यद यांनी केला.

राष्ट्रवादीला विचारात घेऊन प्रभाग रचना
इस्लामपूर / प्रतिनिधी : गेल्या 35 वर्षापासून नगरसेवक असणारे राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते संजय कोरे यांचा राष्ट्रवादीतीलच माजी नगरसेवकांनी केलेला अपमान हा निदंनीय आहे. संजय कोरे यांची राष्ट्रवादीकडून घुसमट केली जात आहे. यामुळे संजय कोरे यांनी शिवसेनेत यावे, त्यांच्यासाठी आमची दारे खुली आहेत. त्यांचा आमच्या पक्षात योग्य तो सन्मान करू, असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख सागर मलगुंडे यांनी केले.
ते शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहरप्रमुख व माजी नगरसेवक शकिल सय्यद, प्रदिप लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मलगुंडे म्हणाले, संजय कोरे यांच्या वडिलांनी शहरासाठी विकासात्मक कामे केली आहेत. संजय कोरे यांनी ही राष्ट्रवादीसाठी एकनिष्ठ काम केले. मात्र, गेल्या अनेक दिवसापासून त्यांची पक्षात घुसमट होत आहे. काल तर मुख्याधिकार्‍यांच्या दालनात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचा केलेला अपमान हा शहरासाठी निंदनीय आहे. यामुळे कोरे यांनी शिवसेनेत यावे वरिष्ठांशी बोलून त्यांचा योग्य तो सन्मान करू.
शकील सय्यद म्हणाले, कोरे यांच्याबाबतीत घडलेला प्रकार हा निंदनीय आहे. मुख्याधिकारी हे एका विशिष्ट पक्षाचेच काम करत आहेत. शहरातील विकासासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांची बैठक घेतली होती. अशी शहरात चर्चा सुरू आहे. त्यांचे कार्यालय हे राष्ट्रवादीचा अड्डा बनला आहे. त्यांनी प्रशासक म्हणून शहराच्या विकासाकडे लक्ष द्यावे. ते गुंठेवारीचा प्रश्‍न मार्गी लावणार होते. मात्र, अजूनही एक हजार फाईली पेंडीग आहेत. यातून पालिकेची आर्थिक सुधारणा झाली असती. त्यांनी घातलेल्या जाचक अटीमुळे एकही गुंठेवारी होत नाही. तसेच स्वच्छतेचे ही तीनतेरा वाजले आहेत. पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. 24 बाय 7 योजना ही गेली 25 वर्षे फक्त कागदावरच दिसत आहे. यावेळी घनशाम जाधव, अंकुश माने आदी उपस्थित होते.

COMMENTS