सत्तेत असूनही शिवसेनची पिछेहाट

Homeताज्या बातम्यासंपादकीय

सत्तेत असूनही शिवसेनची पिछेहाट

राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संंस्थाच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रसने आघाडी घेतली असली तरी काँगे्रस आणि श

मुख्यमंत्री शिवसेनेचा ; सुत्र मात्र राष्ट्रवादीकडे
मेंदूचा वापसा झाला का ?
न्यायव्यवस्थेला हादरे !

राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संंस्थाच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रसने आघाडी घेतली असली तरी काँगे्रस आणि शिवेसेनची होणारी पिछेहाट पक्षासाठी आत्मचिंतन करणारी आहे. राज्यात शिवसेना सत्तेत असून, मुख्यमंत्री स्वतः उद्धव ठाकरे आहेत. त्याचबरोबर सर्वच पक्षांची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. सर्वच पक्षांना स्वबळावर येण्यासाठी प्रयत्न सुरू असून, शिवसेनेने देखील जाहीर याबद्दल भाष्य केले आहे. मात्र शिवसेनेची कामगिरी अशीच ढासळती राहिली तर स्वबळावर सोडा, विरोधात बसण्याची पाळी शिवसेनेवर येऊ शकते. त्यामुळे या निवडणुकांच्या निमित्ताने केलेली चिकित्सा.
राज्यात झालेल्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषदांमधील झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली असली तरी, या यशाला किनार ही सत्ता संघर्षांची असून, यात शिवसेना आणि काँगे्रसची पुरती पिछेहाट झाल्याचे दिसून येते. मात्र यात भाजप आणि राष्ट्रवादी काँगे्रसला सर्वांधिक फायदा होतांना दिसून येत आहे. राज्यातील नगरपंचायतीचा विचार केल्यास राष्ट्रवादी काँगे्रसला भाजपपेक्षा एक जागा जास्त मिळाली आहे. मात्र जागांचा विचार केल्यास भाजप पक्ष म्हणून सर्वाधिक जागा जिंकत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी तिन्ही पक्ष सत्तेत एकत्र आले असले तरी, नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र न येता निवडणूक लढवली. त्यामुळे साहजिकच सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला असला तरी, यातून शिवसेना आणि काँगे्रसची राज्यात कमी होतांना दिसून येत आहे. मात्र याचा सर्वाधिक फायदा भाजप आणि राष्ट्रवादीला होतांना दिसून येत आहे.
राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असला तरी, याचा फायदा पक्षाला होत नसेल, कार्यकर्त्यांचे संघटन चांगल्या प्रकारे वाढवता येत नसेल, तर यातून शिवसेना रसातळाला जाण्याचे चिन्हे आहेत. तर दुसरीकडे काँगे्रसचे मितभाषी असलेले बाळासाहेब थोरात यांच्यावर असलेली काँगे्रसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी काढून ती आक्रमक चेहरा असलेल्या नाना पटोले यांच्याकडे देण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली काँगे्रस प्रथमच नगरपंचायत निवडणुका लढल्या. मात्र यातून काँगे्रसला काडीचाही फायदा झाला नसून, उलट जागा कमी झाल्या असेच म्हणावे लागेल. काँगे्रस राज्यात सत्तेत असली तरी त्यांच्या वाटयाला महत्वाची अशी खाती आलेली नाही. मात्र सत्तेत असल्यामुळे त्यांनी त्याचा फायदा पक्ष संघटन वाढवण्यावर द्यायला हवा होता. राज्यात काँगे्रसला एक विधायक कार्यक्रम देऊन, त्यांनी दिशा देण्याची गरज होती. राज्यात अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे असे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय स्तरावर मोठ-मोठे पद भूषवलेले नेते असतांना देखील राज्यात काँगे्रसचे असे संघटन प्रभावीरित्या समोर येत नाही. आणि नवे नेतृत्व तयार केले जात नाही, ही काँगे्रसची शोकांतिका आहे. या निवडणुकांच्या निकालांची चिकित्सा केल्यास अनेक बाबी समोर येतात. एकूण जागा जर पाहिल्या तर अठराशेहून अधिक जागांसाठी या निवडणुकीत मतदान झालं. ही निवडणूक यासाठीही महत्त्वाची ठरली कारण सर्वोच्च न्यायलायाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षण जिथून गेलं त्या जागांवर खुल्या प्रवर्गातून मतदान झालं. महाराष्ट्राच्या एकूण राजकारणावर परिणाम करणार्‍या प्रश्‍नावर पुढची लढाई न्यायालयात अद्याप सुरू आहे, पण या निवडणुका आरक्षणाविना घ्याव्या लागल्या. म्हणूनही या निवडणुकांकडे लक्ष होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक पातळीवर, गावांतल्या पायवाटांवर राजकीय चित्र कसं आहे हे या निवडणुकांमधून समजणार होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना एकत्र मिळून 67 नगरपंचायतींवर ताबा मिळवता आला आहे आणि त्यांच्याकडे 944 जागा आल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्या वाढल्या आहेत. आघाडीमध्ये आणि राज्यातल्या सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादीला या निवडणुकीत सगळ्यांत जास्त फायदा झाला आहे. त्यामुळे या निवडणुकांतील चुकांमधून शिवसेना आपले स्थान नेमके कुठे आणि याचे आत्मचिंतन करेल यात शंका नाही.

COMMENTS