Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना उबाठा श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी विजय शेंडे

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा तालुक्यातील शेडगावचे सरपंच विजय शेंडे यांनी सोमवारी शिवसेनेत (उबाठा) प्रवेश करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या

तोफखाना पोलिसांची मद्यपी वाहन चालकाविरुद्ध कारवाईची मोहीम 
केडगाव महामार्गावर अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात काम बंद आंदोलन सुरू

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा तालुक्यातील शेडगावचे सरपंच विजय शेंडे यांनी सोमवारी शिवसेनेत (उबाठा) प्रवेश करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधले सरपंच विजय शेंडे यांनी आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत आपल्या गावचा विकास करत विविध उपक्रम राबवुन मोठ्या प्रमाणात गावातील विकासकामे मार्गी लावली  व गावचा नावलौकिक वाढवत अनेक पुरस्कार मिळवले. आपल्या कामाचा ठसा श्रीगोंदा तालुक्यासह राज्यात उमटवला.
यातुनच शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते याच्याशी सलगी निर्माण झाली. त्यातूनच आपल्या गावाबरोबरच आपल्या तालुक्यात विकासगंगा आणण्यासाठी सोमवारी 10 जून रोजी मुंबईत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे याच्या उपस्थितीत त्यांनी हातावर शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर लगेचच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांच्यावर श्रीगोंदा तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी काम करणार असून आता गाव तिथे शाखा स्थापन करून पक्ष संघटन मजबूत करणार असल्याचे सरपंच व नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष विजय शेंडे यांनी सांगितले. त्याच्या निवडीनंतर शेडगाव सह श्रीगोंदा तालुक्यात अनेक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. श्रीगोंदा तालुक्यात त्यांची आढळगाव जि.प.गटातुन शिवसेनेचे उमेदवार म्हणून चर्चा रंगु लागल्या आहेत.

COMMENTS