मुंबई ः राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कधी देतात, याचीच राज्यात प्रतीक्षा होती, मात्र ही प्रतीक्षा संपली असून, ना
मुंबई ः राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कधी देतात, याचीच राज्यात प्रतीक्षा होती, मात्र ही प्रतीक्षा संपली असून, नार्वेकरांनी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असून, शिंदे गटाचे 16 आमदार पात्र ठरवले, यासोबतच ठाकरे गटाचेही आमदार पात्र असल्याचाही महत्वपूर्ण निकाल नार्वेकरांनी दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
पक्ष कुणाचा यासाठी नार्वेकरांनी पक्षाची घटना विचारात घेतली असून, पक्षप्रमुख कुणालाही पक्षातून काढू शकत नाही, त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीने बहुमताने निर्णय घेणे अपेेक्षित असल्याचे स्पष्ट करत नार्वेकरांनी शिवसेनेची 1999 ची घटना ग्राह्य धरली असून, पक्षाने 2018 मध्ये केलेली घटनादुरूस्ती अवैध ठरवत हा निर्णय दिला आहे. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मत विचारात घेऊन हा निर्णय देण्यात आला आहे. पक्षप्रमुखाला थेट कुणालाही पक्षातून काढता येत नाही. एकनाथ शिंदेंना काढण्याचा उद्धव ठाकरेंना कोणताही अधिकार नाही. राष्ट्रीय कार्यकरणीसोबत चर्चा करुनच पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेता येतो. शिवसेना पक्ष प्रमुखांना कोणालाही पक्षातून काढण्याचे अधिकार नाही.
त्यामुळे एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याचा अधिकार नाही, असे नार्वेकर यांनी निकाल वाचतांना स्पष्ट केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत हे पक्षाचे मत असू शकत नाही. त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी सोबत चर्चा करूनच निर्णय घेणे अपेक्षित आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्ष प्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंवर केलेली कारवाई मान्य करता येणार नाही. पक्षात बंडाळी झाल्यानंतर पक्षप्रमुख या नात्याने नेता आपला आदेश पक्षाचा आदेश म्हणून वापरू शकतो. पण जर पक्षातील इतर नेत्यांनी घटनेच्या आधारावर नवा नेता पक्षप्रमुख म्हणून निवडला असेल तर त्याचाच दावा घटनेनुसार अधिकृत मानावा लागेल. आधीच्या घटनेनुसार उद्भव ठाकरेंना कोणालाही पदावरून हटवण्याचा अधिकार नसल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे गटाकडून याचिकेत केल्या गेलेल्या दाव्यांवर नार्वेकरांकडून सवाल उपस्थित केले गेले आहेत. तर त्याला उत्तर देताना शिंदे गटाकडून सादर केलेली उत्तर आणि पुराव्यांशी सहमत असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना नेतृत्त्वावरील दाव्यांबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निकाल स्पष्ट आहे. पक्षात बंडखोरी झाल्यानंतर खरा पक्ष कोणाचा हा मुद्दाही विचारात घेणे महत्त्वाचे होते.21 जून 2022 रोजी शिवसेनेत दोन गट पडले. पक्षात दोन गट पडले हे 22 जून रोजी लक्षात आले. 22 जून 2022 रोजी विधानसभा अध्यक्ष या नात्याने माझ्यासमोर आलेले मुद्देही महत्त्वाचे आहेत. शिवसेना कुणाची?, याचे उत्तर त्यांच्या पक्ष नेतृत्त्वाच्या निवड पद्धतीवर आणि घटनेवर अवलंबून असून, त्यानुसारच निर्णय दिल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले.
शिवसेनेची 2018 ची घटनादुरूस्ती अवैध – शिवसेनेची 2018 ची पक्षाची घटना ग्राह्य धरली जाणार नाही, कारण निवडणूक आयोगाकडे याची नोंद नाही. त्यामुळे 1999 ची घटना ग्राह्य धरली जाईल. 1999 ची घटना शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे दाखल झालेली अभिलेखावर असलेली एकमेव घटना आहे. प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या 1999 सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल. 2018 ची शिवसेनेची घटना स्वीकार करता येणार नाही. निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या घटनेच्या संदर्भात दोन्ही गटात मतभेद आहे. खरी शिवसेना कुणाची हे सांगण्यासाठी घटनेचा आधार घेतला असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले.
ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी बुधवारी दिलेल्या निकालामध्ये पक्ष शिंदे यांचाच असल्याचे स्पष्ट करत त्यांचे 16 आमदार पात्र ठरवले. त्यामुळे या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सत्तासंघर्षाचा शेवट हा सर्वोच्च न्यायालयातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भरत गोगावलेंचा व्हीप ठरवला वैध – खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे सांगतानाच भरत गोगावले यांचा व्हीव वैध असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. आमदार अपात्रेताच निकाल देताना राहुल नार्वेकर यांनी अनेक महत्वाची निरीक्षणे नोंदवली. त्यामध्ये उद्धव ठाकरेंची 2018 मध्ये पक्षप्रमुख म्हणून झालेली निवड अयोग्य, असल्याचेही महत्वाचे निरीक्षण नोंदवले. तसेच ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांचा व्हीप नार्वेकरांनी अवैध ठरवला आहे.
COMMENTS