Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नुकसानग्रस्त पिकांच्या भरपाईसाठी वडूजमध्ये शिवसेनेचे आंदोलन

वडूज / प्रतिनिधी : खटाव माण तालुक्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी या मागणीस

संगमनेर शेतकी संघाचा गुणवत्तेतून राज्यात प्रथम क्रमांक – आ. डॉ. तांबे
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 5 कोटींचा निधी मंजूर
कराड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड कामगाराचा मुुलगा ठार

वडूज / प्रतिनिधी : खटाव माण तालुक्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी आज वडूज, ता. खटाव येथे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
जिल्हाप्रमुख प्रतापराव जाधव, तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात माजी तालुकाप्रमुख युवराज पाटील, दिनेश देवकर, यशवंत जाधव, संतोष दुबळे, अमित कुलकर्णी, अमिन आगा, अजित पाटेकर, अजित देवकर, सलमा शेख, सुशांत पार्लेकर, आबासाहेब भोसले, चंद्रकांत फाळके, सचिन करमारे, आप्पासाहेब खुडे, अभिजीत साळुंखे, शुभम गायकवाड, सोमनाथ खुडे, निखील राऊत, आदित्य राऊत, काका पवार आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.
प्रारंभी शिवसैनिकांनी निष्क्रीय राज्यकर्त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. अतिवृष्टीमुळे सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, अशी मागणी केली.
जिल्हाप्रमुख जाधव म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांचे जीवनमान धोक्यात आले आहे. या तालुक्यांत अशी परिस्थिती असताना पालकमंत्री, मतदार संघाचे खासदार तसेच या तालुक्यांचे आमदार दुर्लक्षीतपणाची भूमिका घेत आहेत. पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींच्या निष्क्रीयतेविरोधात शिवसैनिक शेतकर्‍यांचे प्रश्‍न घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. पन्नास खोके.. एकदम ओके करून हे लोकप्रतिनिधी सत्तेत आले आहेत. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिक शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर रस्त्यावर उतरले आहेत. याबाबत तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आगामी काळात व्यापक स्वरूपात आंदोलन करू.
यावेळी शिवसैनिकांनी शेतांत कुजलेली शेतीपिके तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला बांधली. आंदोलकांच्यावतीने तहसिलदार किरण जमदाडे यांना निवेदन देण्यात आले.

COMMENTS