Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छगन भुजबळांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध

शिंदे गटात बंडखोरीचे संकेत

मुंबई प्रतिनिधी - मागील काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरुन भाजप आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातच या जागेवर अजित पवार

समीर वानखेडेंच्या घरावर सीबीआयचा छापा
अधिकारी नव्हे लोकशाहीचा नोकर होऊन काम करेल- विनायक नरवडे
जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : डॉ. सुजय विखे

मुंबई प्रतिनिधी – मागील काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरुन भाजप आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातच या जागेवर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे निवडणूक लढवणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरून शिंदे गटातील पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास बंड करू, असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. शिवसेना पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. काही वेळातच मुंबईत या बैठकीला सुरुवात होणार आहे. पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि नाशिक शिवसेना शहराध्यक्ष प्रवीण तिदमे यांची बैठकीला उपस्थिती असणार आहे.  नाशिक लोकसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार हेमंत गोडसे हेच निवडणूक लढवणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर भाजप आणि शिंदे गटात चांगलंच वाकयुद्ध सुरु झालं होतं. महायुतीतील जागावाटपावर वरिष्ठ चर्चा करत असताना श्रीकांत शिंदे यांनी कोणाला विचारून नाशिक लोकसभेची उमेदवारी जाहीर केली? असा संतप्त सवाल भाजप पदाधिकाऱ्यांनी विचारला होता. इतकंच नाही, तर भाजपने यंदा नाशिकच्या जागेवर उमेदवार द्यावा, अशी मागणी देखील भाजप पदाधिकारी करीत होते. 

COMMENTS