Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यवतमाळ मध्ये भररस्त्यात शिवसैनिकाची हत्या

यवतमाळ प्रतिनिधी - यवतमाळ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात आरोपींनी भररस्त्यात एका शिवसैनिकाची चाकूने सपापसप वार केले. या घटने

लग्नास नकार दिल्याने तरुणीची भररस्त्यात हत्या
शेतीच्या वादातून शेतकर्‍याची निर्घुण हत्या.
महाविद्यालयीन तरुणीचा गळा आवळून खून

यवतमाळ प्रतिनिधी – यवतमाळ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात आरोपींनी भररस्त्यात एका शिवसैनिकाची चाकूने सपापसप वार केले. या घटनेत शिवसैनिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. थरकाप उडवणारी ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. योगेश नरहरी काटपेलवार (३६) रा. देवीनगर लोहारा असे मृताचे नाव आहे. योगेशचा खून जुन्या वादातून झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. योगेश यांचा मृतदेह घटनास्थळावरून शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेत मारेकरी कोण याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. शिवाय घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेल्या एका संशयितासह महिलेलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ करीत आहे.

COMMENTS