शिर्डी प्रतिनिधी ः श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपळस गावात ग्रामदैवत रामेश्वर मंदिर प्रांगणात मंत्री राधाकृष्ण विखे
शिर्डी प्रतिनिधी ः श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपळस गावात ग्रामदैवत रामेश्वर मंदिर प्रांगणात मंत्री राधाकृष्ण विखे प्रणित जनसेवा मंडळ, पिंपळस आयोजित शिवजन्मोत्सव साजरा करून महाराजांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रतिमेचे पूजन प्रथम लोकनियुक्त सरपंच नंदाताई दत्तात्रय घोगळ व ग्रा.पं. सदस्या आशाताई राजेंद्र कुदळे यांनी केले तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक निवृत्ती तात्या सोनावणे यांनी श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथेही शिवजयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. पिंपळस गावची शिवकन्या कल्याणी कुदळे हिने आपल्या पहाडी आवाजात सर्व महापुरुष यांचे विचार मांडत शिवरायांचे चरित्र व विचारांची आज सर्वांना गरज आहे तसेच शिवाजी महाराज यांना डी जे लावून, गाड्यांना झेंडे लावून, डोक्यावर घेऊन नाचण्या पेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेणं काळाची गरज बनली आहे अशा प्रकारे कल्याणीने आपले विचार सर्वांपुढे ठेऊन सर्वांना मार्गदर्शन केले. जनसेवा मंडळाचा युवा कार्यकर्ता किरण वाघमारे यानेही आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार भीमराज कुदळे यांनी केले. वेळी जनसेवा मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय घोगळ, सरपंच भारत लोखंडे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश पुंड, संचालक अंबादास आण्णा कुदळे, ग्रा. पं. सदस्य.राजेंद्र कुदळे, बाळासाहेब जगदाळे, पोलिस पाटील बाळासाहेब वाघमारे, संपत चिकणे, शरद कुदळे, सुधीर पुंड, सूर्यभान चिकणे, दिलीप वाघमारे, बाबासाहेब वाघमारे, संजय वाघमारे, शेतकरी नेते रमेश वाघमारे, राजेंद्र वाघमारे, अशोक लोखंडे, विष्णू वाघमारे जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते रविंद्र कापसे, विकी कुदळे, वैभव सोनवणे, ऋषी मगर, कुणाल वाघमारे, किरण वाघमारे, सागर वाघमारे, गोविंद वाघमारे, सुनील ठमके, विकास वाघमारे कार्यकर्ते, ग्रामपंचायत कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS