Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली ; साई संस्थानच्या 2 कर्मचार्‍यांची चाकूने भोसकून हत्या

शिर्डी : सबका मालिक एक आहे, असा मानवतेचा संदेश देणार्‍या साईबाबांच्या शिर्डीत दोघांची हत्या केल्यामुळे शिर्डी हादरली. सोमवारी पहाटे साई संस्थानच्

मुख्यालयी राहण्याच्या बंधनातून जि.प. शिक्षकांना मुक्त करा
मानोरीत भर दिवसा बिबट्याचा धुमाकुळ
डिपीचे उद्घाटन करणारा राज्यातील पहिला मंत्री राज्याला लाभला

शिर्डी : सबका मालिक एक आहे, असा मानवतेचा संदेश देणार्‍या साईबाबांच्या शिर्डीत दोघांची हत्या केल्यामुळे शिर्डी हादरली. सोमवारी पहाटे साई संस्थानच्या दोन कर्मचार्‍यांची दोन वेगवेगळ्या घटनेत चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेत अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. मात्र हा हल्ला नेमका कोणत्या कारणाने केला ते अजूनही स्पष्ट झालेले नाही. दोघेही मृत साई संस्थानशी संबंधित होते, त्यामुळे या हत्येमागे नेमके कारण काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यासंदर्भातील अधिक माहिती अशी की, सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजुळ अशी मृत कर्मचार्‍यांची नावे आहेत. तर कृष्णा देहरकर असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. कृष्णावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहत. मृत कर्मचारी व जखमी तरुण सोमवारी पहाटे साई संस्थानच्या आपल्या नोकरीवर येत होते. पण रस्त्यातच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात सुभाष व नितीन हे दोघेही जागीच ठार झाले. या दोघांवर तासाभराच्या अंतराने हल्ला करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना त्याची माहिती कळवली. पण पोलिसांनी तासभर विलंबाने घटनास्थळ गाठल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. इथे कुणीही कुणासाठी लगबगीने येत नाही, असा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला. या हत्येला अपघाताचे स्वरुप देण्यात येत असल्याचा आरोपही या प्रकरणी केला जात आहे. मृत सुभाष घोडे हे शिर्डीच्या करडोबा नगर चौकात राहत होते. त्यांच्यावर घरापासून काही अंतरावरच हल्ला करण्यात आला. तर नितीन शेजुळ व कृष्णा देहरकर यांच्यावर श्रीकृष्ण नगर भागात हल्ला झाला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. या तरुणांची हत्या पूर्ववैमनस्यातून करण्यात आली का? याचाही तपास घेतला जात आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मात्र या हत्येने शिर्डीत खळबळ उडाली आहे.

एका आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, यातील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज चेक केले असता त्यामधील दोन आरोपी दिसत आहे. यातील एका आरोपीला ताब्यात घेतले असून दुसर्‍या आरोपीचा लवकरच शोध घेऊन गुन्हे दाखल केला जाईल. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, आरोपी हे गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत की नाही हे तपासात समजेल. एक जण गंभीर जखमी अजून त्याच्यावर प्रवरानगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची सुद्धा एफआरआय नोंदण्याचे काम सुरू आहे. सर्व आरोपींना लवकरच पकडून पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पोलीस अधीक्षक ओला यांनी सांगितले.

चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचा संशय
मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशानं तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तीनही निरपराध नागरिकांवर चाकूनं असंख्य वार केले. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS