मुंबई : गेल्या अनेक दशकांपासून एकनाथ शिंदे शिवसेनेसोबत एकनिष्ठ असतांना, त्यांना अचानक बंड का करावे लागले. बंड त्यांनी एकाएकी केले नसून, त्याला अनेक व
मुंबई : गेल्या अनेक दशकांपासून एकनाथ शिंदे शिवसेनेसोबत एकनिष्ठ असतांना, त्यांना अचानक बंड का करावे लागले. बंड त्यांनी एकाएकी केले नसून, त्याला अनेक वर्षांची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे विधीमंडळ गटनेते. म्हणजेच शिवसेनेच्या सर्व आमदारांचे प्रमुख. मात्र शिवसेनेमध्ये कोणताही निर्णय घेतांना शिंदे यांना सातत्याने डावलण्यात येत होते. त्यामुळेच शिंदे यांनी बंड केल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा असला, तरी निधी वाटपात राष्ट्रवादी काँगे्रसचा वरचष्मा असल्यामुळे शिवसेना आमदार नाराज होते. मात्र याची दखल मुख्यमंत्री ठाकरे घेत नसल्यामुळेच शिंदे यांनी बंडांचा झेंडा हाती घेतल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते आहेत. सर्व आमदारांचे प्रमुख असूनही त्यांनी प्रमख निर्णय प्रक्रियेतून नेहमी दूर ठेवले जाते. हे कुणाच्या सांगण्यावरून केलं जात होतं. याचीही माहिती एकनाथ शिंदे यांना होती. तरीही कधी ना कधी न्याय मिळेल या आशेने ते पक्षात कार्यरत राहिले. मात्र राज्यसभा आणि विधान परीषद निवडणुकीची सर्व सूत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे दिली आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांमध्ये बंडाची ठिणगी पेटली. गेली अडीच वर्षे मनात धगधगणार्या ज्वालामुखीचा अखेर आज स्फोट झाला. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवले होते. तसे अधिकृत पत्रही राज्यपालांना देण्यात आले होते. मात्र शिवसेना नेते संजय राऊत आणि सुभाष देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध केला होता. शिवसेना पक्षात आणखी एक नारायण राणे निर्माण होईल आणि मग तो पक्षाला डोईजड होईल. अशी कारणे देत उद्धव ठाकरे यांचे कान भरण्यात आले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री बनण्याचे रास्ता रोखला गेला. गेल्या अडीच वर्षात देखील पक्षातील प्रमुख निर्णय प्रक्रियेतून एकनाथ शिंदे यांना परस्पर दूर ठेवलं जात होते. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सर्वात बलाढ्य नेते आहेत. असे असूनही त्यांना मिळणारी सापत्न वागणूक शिवसेनेच्या इतर आमदारांनाही खटकत होती, असे वेळोवेळी दिसून आल्यामुळेच शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याचे बोलले जात आहे.
COMMENTS