मुंबई प्रतिनिधी ः शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटाचा सामना राज्यात सत्तांतर होऊन सहा महिने झाले तरी संपण्यांची चिन्हे नाहीत. उलट हा सामना जोरदार रंगता

मुंबई प्रतिनिधी ः शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटाचा सामना राज्यात सत्तांतर होऊन सहा महिने झाले तरी संपण्यांची चिन्हे नाहीत. उलट हा सामना जोरदार रंगतांना दिसून येत आहे. शिंदे-फडणवीस सरकार व्हेंटिलेटरवर असून, हे सरकार फेबु्रवारी अखेर पायउतार होणार असल्याचे संकेत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
कायद्यानुसार, 16 आमदार अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे हे सरकार सध्या व्हेंटिलेटरवर आहे. हे सरकार कधी उलथवायचे हे जनतेला चांगले ठाऊक आहे. शिवसेना एकच आहे आणि कायम एकच राहील. उध्दव ठाकरेंसोबत अख्या महाराष्ट्र उभा आहे. त्यामुळं नाशिकचे शिवसैनिक जागेवरच आहेत, ते कुठंही जाणार नाहीत. सध्या राज्यातले वातावरण परिवर्तनाच्या दिशेने सुरु आहे, त्यामुळे हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा पुनरुच्चार राऊतांनी केला. अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणे बसून होते. सरकारमध्ये दोन गट आहेत. तुमचे तुम्ही बघा, आमचे आम्ही बघा सुरू आहे. तुमचे तुम्ही बघावाल्यांचे सरकार 40 आमदारांच्या पलिकडे नाही. 40 आमदारांची ख्याली खुशाली पाहण्यासाठी सुरू आहे. राज्यात 2024 ची तयारी सुरू आहे. त्याआधीच परिवर्तन होईल. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. माझे मत पक्के आहे, असेही राऊत म्हणाले. ‘ शिवसेनेच्या 16 आमदारांविरोधात अपात्रतेचा खटला कोर्टात सुरु आहे. न्यायव्यवस्थेतवर कोणताही दबाव आला नाही तर निकाल आमच्या बाजूने लागणार. आणि न्यायालयात आम्हाला न्याय मिळणार, हे निश्चित आहे त्यामुळे हे सरकार फार काळ टिकाणार नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो, असा दावा राऊतांनी केलाय. शिवसेना आमदारांवरील अपात्रतेची कारवाई आणि विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार कक्षांचा उहापोह करणार्या याचिकेवरील सुनावणी येत्या 10 जानेवारी रोजी आहे. या सुनावणीकडे राज्याचच नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. अपात्र आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची नावे आहेत. त्यामुळे खरंच सरकार पडणार नाही काय, या चर्चांना ऊत आला.
शिवसेना संपवण्याची राऊतांनी सुपारी घेतलीय ः मंत्री राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातला वाद पुन्हा एकदा वाढला आहे. संजय राऊत यांनी काल नारायण राणे यांच्यावर निशाणा साधत मैदानात येण्याचे खुले आव्हान केले. यावर आता राणेंनी राऊतांना खरमरीत प्रत्युत्तर देत हे चॅलेंज स्वीकारले आहे. मी शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली ती संजय राऊतांनी घेतली आहे. माझे संरक्षण सोडून मी संजय राऊतांसमोर जाणार, असे म्हणत राणेंनी राऊतांचे चॅलेंज स्वीकारले आहे. राऊतांचे काय योगदान आहे. आजच्या राजकारणातले ते जोकर आहेत. शिव्या घालण्यापलीकडे काही करत नाहीत. काशीला आणि सारनाथला आमचा राम घेवून चालला आहे. तिथे रामाचे कार्य चालू असताना रावणाचा उल्लेख कशाला? मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे की, मी खासदार झाल्यावर संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचे आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याविषयी जे बोलायचे ते मी त्यांना सांगणार आहे. ते ऐकूण दोघांनी राऊतांना चपलेने मारलं नाय तर मला विचारा. मी आज ना उद्या माझं सर्व संरक्षण सोडणार आणि संजय राऊतांना भेटायला जाणार, असं नारायण राणे यावेळी म्हणाले.
COMMENTS