मुंबई ः पालघर लोकसभेसाठी शिंदे गटाचे अर्थात शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावितांना उमेदवारी नाकराल्यामुळे त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून

मुंबई ः पालघर लोकसभेसाठी शिंदे गटाचे अर्थात शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावितांना उमेदवारी नाकराल्यामुळे त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. दिल्लीसह राज्यातून सातत्याने उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात येत नव्हती. अखेर खासदार गावित यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.
पालघर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार असलेले राजेंद्र गावित यांना यावेळी शिवसेनेने उमेदवारी नाकारली होती. मात्र, राजेंद्र गावित यांना विचारूनच आपण उमेदवार बदलला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राजेंद्र गावित दिल्लीपेक्षा महाराष्ट्रामध्ये चांगले काम करू शकतात. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातच राहावे, अशी आम्ही विनंती केली होती. त्यानुसार राजेंद्र गावित आता महाराष्ट्रात चांगले काम करतील, असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने भाजपचे हेमंत सावरा यांना पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर या मतदारसंघातील विद्यमान खासदार राजेंद्र गावित नाराज असल्याची चर्चा रंगली होती. महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रॅलीला देखील राजेंद्र गावित यांनी उपस्थिती लावली नाही. तिकीट कापले गेल्यामुळे गावित यांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली होती. मात्र, आता त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून त्यामुळे महायुतीला पालघर लोकसभा मतदारसंघातील नाराजी दूर करण्यात मोठे यश मिळाले आहे.
COMMENTS