Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुदळे दाम्पत्यास शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे जीवनगौरव पुरस्कार

कोपरगाव प्रतिनिधी ः गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणार्‍या कोपरगांव येथील शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे प्रतिष्ठाण व र

सप्टेंबर महिन्यातील धान्यांपासून रेशनधारक वंचितच
नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मिसबाह शेख यांचा सन्मान
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मनोंद असलेलं अप्रकाशित मोडीपत्र उजेडात l DAINIK LOKMNTHAN

कोपरगाव प्रतिनिधी ः गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणार्‍या कोपरगांव येथील शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे प्रतिष्ठाण व रेन्बो इंटरनॅशनाल स्कुलच्या माध्यामातुन राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, शेती आदी क्षेत्रात भरीव योगदान असणारे माजी नगराध्यक्ष पदमाकांत कुदळे व धनश्री महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा शिलाताई कुदळे यांना जीवनगौरव पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आला असल्याची माहिती रेन्बो इंटरनॅशनाल स्कुलचे कार्यकारी संचालक आकाश नागरे यांनी दिली.
पदमाकांत कुदळे हे राज्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थेवर मुख्य पदावर कार्यरत असून त्यात अखिल भारतीय माळी शैक्षणिक संस्था पुणे च्या मुख्य विश्‍वस्त पदी, एस,एस,जी. एम महाविद्यालय कोपरगाव स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, के.बी.पी विद्यालय कोपरगाव स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य व अध्यक्ष, आशिया खंडातील अग्रगण्य रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य, कोपरगाव माळी बोर्डिंगचे विश्‍वस्त, कोपरगाव बागायतदार सोसायटीचे अध्यक्ष, कोपरगाव तालुक्यातील अग्रगण्य धनश्री महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेत देखील त्यांचा मोलाचा वाटा असून त्यांनी कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील अतिशय उत्कृष्टपणे सांभाळली असून ते गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील तळागाळातील गोरगरीब, विद्यार्थी, कष्टकरी, शेतकरी आदी समाजातील प्रत्येक घटकांच्या प्रश्‍नासाठी लढत असून त्यांच्या या अद्वितीय कार्याची दखल घेऊन त्यांना शिक्षण महर्षी लहानभाऊ नागरे प्रतिष्ठाण व रेन्बो इंटरनशनल स्कुलच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याने नक्कीच कोपरगावकरांसाठी ही अभिमानास्पद बाब असून यामुळे पदमाकांत कुदळे यांच्या रूपाने कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सदर पुरस्काराचे वितरण विविध मान्यवरांच्या शुभहस्ते सोमवार, दि. 27 मार्च 2023 रोजी सायं. 6 वाजता साईसृष्टी लॅन्स, शिर्डी-कोपरगाव रोड, तिनचारी, येथे होणार आहे.

COMMENTS