Homeताज्या बातम्याक्रीडा

शिखर धवन आणि आयशा मुखर्जीचा घटस्फोट

 टीम इंडियाचा स्टार खेळाडू शिओखर धवनच्या आयुष्याला कलाटणी देणारी बातमी आहे. शिखर धवनचा पत्नी आयशा मुखर्जीसोबत घटस्फोट झाला आहे. दिल्लीच्या पटियाल

पंचांच्या खराब कामगिरीमुळे दिल्लीच्या विजयाला गालबोट 
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी फलटणनगरी सज्ज
’सातारा मेगा फूड पार्क’ येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन: वरिष्ठ महिला व वरिष्ठ ग्रीको रोमन अजिंक्य पदासाठी राज्यातील खेळाडू सज्ज

 टीम इंडियाचा स्टार खेळाडू शिओखर धवनच्या आयुष्याला कलाटणी देणारी बातमी आहे. शिखर धवनचा पत्नी आयशा मुखर्जीसोबत घटस्फोट झाला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस परिसरातील फॅमिली कोर्टाने या दोघांच्याही घटस्फोटाला परवानगी दिली आहे. आयशाने शिखरला मुलापासून दूर ठेवून शिखरला मानसिक त्रास दिल्याचंही कोर्टाने मान्य केलं आहे

फॅमिली कोर्टाचे वकील हरीश कुमार यांनी यांनी घटस्फोटाच्या याचिकेत शिखर धवनने पत्नी आयशावर लावलेले सर्व आरोप स्वीकारले आहेत. आयशाने या आरोपांचा विरोध केला नाही. किंवा ती या आरोपापासून स्वत:चा बचाव करण्यात कमी पडली आहे, असंही कोर्टाने म्हटलं आहे शिखरने या घटस्फोटाच्या याचिकेत आयशावर गंभीर आरोप केले होते. पत्नीने आपला मानसिक छळ केला असल्याचा आरोप शिखरने याचिकेत केला होता. दरम्यान, कोर्टाने मुलाच्या ताब्याबाबत कोणताही  स्पष्ट आदेश पारित केला नाही. मुलगा कुणाकडे राहणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. सध्या मुलगा आयशाकडे आहे. त्यामुळे कोर्टाने शिखरला मुलाला भेटण्याची परवानगी दिली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात उचित वेळेत मुलाशी व्हिडीओ कॉलवर बोलण्याची परवनागी शिखरला देण्यात आली आहे. तसेच शाळांच्या सुट्ट्यांमध्ये कमीत कमी काळासाठी मुलाला शिखरसोबत आणि शिखरच्या कुटुंबीयांसोबत रात्रभर राहण्यासाठी आणि त्यांच्या भेटीसाठी भारतात आणण्याचा आदेशही कोर्टाने आयशाला दिला आहे.

COMMENTS