Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगाव-पाथर्डी तालुक्याने मतदानाद्वारे भरभरुन प्रेम दिले : मोनिका राजळे

शेवगाव तालुका   शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीतील हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी दोन्ही तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान

शिवांकुर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात
श्रीगोंद्यात आज बैलगाडा शर्यतीचे आयोजन
कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी नगरमध्ये कँडल रॅली..

शेवगाव तालुका

  शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीतील हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी दोन्ही तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा पाथर्डी-नगर रस्त्यावरील हाॅटेल मधुबन येथे आयोजित केला होता त्या वेळी आमदार मोनिकाताई राजळे यांनी मी मतदार संघात कधीच जातीपातीच राजकारण केले नाही आणि भविष्यात ही करणार नाही शेवगाव-पाथर्डी तालुक्याने मतदानाद्वारे भरभरुन प्रेम दिले आहे त्याची उतराई होण्यासाठी सदैव प्रयत्न करीन अशी ग्वाही आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथर्डी बाजार समितीचे सभापती सुभाषराव बर्डे हे होते.यावेळी व्यासपीठावर उमेश मोरगावकर,अविनाश मंत्री, म्रुत्युंजय गर्जे,अभयकाका आव्हाड,नंदकुमार शेळके, जनार्दन लांडे, जनार्दन वांढेकर हे  उपस्थित होते. आमदार राजळे पुढे म्हणाल्या की शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील रस्त्यांची कामे, न्यायालयाची इमारत, पाणीपुरवठा योजना, अशी अनेक ठिकाणी राहिलेली कामे करायची आहेत.पत्रकारांचे कौतुक केले पाहिजे सामांन्य जनतेची कामे जे पत्रकारा पर्यंत येते ते आम्हाला तुमच्या माध्यमातून कळते.निवडून आल्यावर आम्ही विधानसभेत अशी शपथ घेतो की कोणामध्येही दूजाभाव न करता लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची जी शपत घेतली जाते ती तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करू.मतदार संघातील कोणत्या गावात किती मतं दिली याचा विचार करून कधीच दुजाभाव करणार नाही असे सांगितले. तसेच एसटी महामंडळाने शेवगाव पाथर्डी आगारासाठी दहा पंधरा नविन बसगाड्या देण्यासाठी पेपरमध्ये आलेल्या बातम्याची कात्रणे दाखवून प्रकाश सरनाईक यांना विनंती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूकीत आपण दोन नंबरला राहू असे वाटत होते परंतु शेवगाव करांनी एक नंबर आणि पाथर्डीने ही एक नंबरची मते दिली म्हणून आपल्याला हे यश संपादन करता आले. कुठल्याही क्षेत्रातील व्यक्तींशी आकस न ठेवता काम केले म्हणून ही मताच्या रुपाने कामाची पावती मिळाली आहे. शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील सर्व पत्रकारांना येत्या अधिवेशन काळात अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात निश्चितपणे अधिवेशनातील कामकाज पहाण्यासाठी घेऊन जाण्यात येणार आहे.असाही शब्द त्यांनी दिला. दहा पंधरा पत्रकारांचा ग्रुप तयार करून निश्चित अधिवेशन पाहायला संधी देण्यात येणार आहे.यावेळी पत्रकार राजेंद्र सावंत यांना नाशिकमध्ये पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार राजळे यांनीही सर्व प्रथम त्यांचा सन्मान केला.याप्रसंगी कानिफनाथ पाठक, विठ्ठल साबळे,रमेश भुसारी अर्जुन नेहुल सुरेश बाबर शंकर जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS