Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकी तालुका संघाने संस्थापक सदस्यांना दिला न्याय देविदास पिंगळे यांचे प्रतिपादन

नाशिक शेतकी तालुका संघाची विशेष सर्वसाधारण सभा

पंचवटी-  नाशिक शेतकी तालुका संघाच्या स्थापनेवेळी ज्या संस्थापक सदस्यांनी पंचवीस रुपये प्रत्येकी वर्गणी काढून आपले योगदान देत संस्था उभी केली होती

पुण्यातील तरुण मुंबई गोवा हायवेवर अपघातात ठार!
सीबीएसईच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
फलटण तालुका सहकारी दुध संघाची निवडणूक बिनविरोध

पंचवटी–  नाशिक शेतकी तालुका संघाच्या स्थापनेवेळी ज्या संस्थापक सदस्यांनी पंचवीस रुपये प्रत्येकी वर्गणी काढून आपले योगदान देत संस्था उभी केली होती. त्यांना मागील संचालक मंडळानी मतदानापासून वंचित ठेवत सभासदपद रद्द केले होते, त्या सदस्यांना पुन्हा  सभासदपद बहाल करीत नवनिर्वाचित संचालक  मंडळानी न्याय मिळवून दिला. सभासदांना दिलेला शब्द पाळला गेला असे प्रतिपादन माजी खासदार तथा बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी केले. ते नाशिक शेतकी तालुका संघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत बोलत होते.

यावेळी सभेत नाशिक शेतकी तालुका संघाचे विजयी सभापती दिलीपराव थेटे, उपसभापती दिलीप चव्हाण, शरद गायखे, बबन कांगणे, रावसाहेब कोशिरे, विष्णू थेटे, भिकाजी कांडेकर, शांताराम माळोदे, दीपक हगवणे, आशा गायकर, जयराम ढिकले, वाळू  काकड, ढवळू फसाळे, शंकरराव पिंगळे, योगेश रिकामे, तानाजी पिंगळे उपस्थित होते. 

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवराज कोठूळे, राजाराम धनवटे, विलास कड, माजी संचालक विश्वास नागरे, तुकाराम पेखळे, संजय तुंगार,आणि आबासाहेब बर्डे, विलास कड, विलास कांडेकर ,भास्कर गोडसे  काळू थेटे,  निवृत्ती कांडेकर, किसन कांडेकर, गोकुळ काकड, गणेश कहांडळ, दौलत पाटील, भाऊसाहेब भावले,धनाजी पेखळे, नामदेव गायकर तसेच नाशिक तालुक्यातील शेतकी तालुका संघाचे सभासद शेतकरी उपस्थित होते. 

या विशेष सर्वसाधारण सभेप्रसंगी प्रथम श्रीगणेश पूजन , छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच शेतकी तालुका संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.त्यानंतर विशेष सर्वसाधारण सभेची सुरुवात करून आठ विषयांवर चर्चा करून मंजूर करण्यात आले.

बाजार समिती सभापती देविदास पिंगळे म्हणाले की, मालेगावची संघाची जागा विकण्याऐवजी तशीच ठेवावी, भविष्यात तिची किंमत वाढेल. मागील पंचवार्षिक मध्ये झालेल्या कारभाराचे ऑडिट करा, पुढे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांपुढे मांडा. शेतकी तालुका संघ , बाजार समिती, मविप्र यांच्या सर्वच्या सहमतीने मोजणी करून कोणी अतिक्रमण केले असेल ते काढून ती शेतकी तालुका संघाच्या नावावर करू. पंचवीस रुपये भरून ज्यां सभासदांनी संस्था उभी केली आहे त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही.यासाठी विशेष सर्व साधारण सभा घेण्यात आली होती.त्यासाठी सर्वांनी सहमती दर्शवली आहे.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तज्ञ संचालक शंकरराव पिंगळे  व व्यवस्थापक संदीप थेटे यांनी केले. सभापती दिलीप थेटे आभार मानले.

COMMENTS