जामखेड : महाराष्ट्र शासनाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय तसेच शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा देख
जामखेड : महाराष्ट्र शासनाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय तसेच शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा देखील त्याच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुरू केलेल्या “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” या योजनेंतर्गत जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत येथे नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी रु.१,४६,७५,६८४ (एक कोटी सेहेचाळीस लक्ष पंच्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी) एवढ्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती पै. शरद कारले यांनी दिली आहे.
जामखेड तालुक्याचे भुमीपुत्र विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमांतून जामखेड बाजार समितीत शेतकरी व व्यापारी बांधवांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेले कर्तव्यदक्ष सभापती पै. शरद कारले व सर्व संचालक मंडळाने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. त्यानुसार
राज्याच्या सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाने आज दि. २२ एप्रिल रोजीच सदर मान्यतेचे परिपत्रक जारी केले. सभापती प्रा. शिंदे यांच्या माध्यमांतून सर्व स्तरातील नागरिकांचा विकास होत असताना शेतकरी तरी कसे मागे राहतील. त्याच अनुषंगाने जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत पै. शरद कार्ले यांच्या नेतृत्वाखाली व सर्व संचालक मंडळाच्या सहकार्यने विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमांतून अनेक विकास कामे तसेच शेतकरी व व्यापारी यांच्यासाठी विविध सोईसुविधांची निर्माण केल्या जात आहेत. लवकरच जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे भव्य शेतकरी भवन उभा राहणार आहे असे सभापती पै शरद कारले यांनी सांगितले.
COMMENTS