नवीमुंबई प्रतिनिधी - पनवेल कामोठे इथल्या हॅप्पी सिंग या भाजपच्या पदाधिकाऱ्याने आणि त्याच्या साथीदारांनी कामोठे येथे शिवजयंतीच्या दिवशी झालेल्

नवीमुंबई प्रतिनिधी – पनवेल कामोठे इथल्या हॅप्पी सिंग या भाजपच्या पदाधिकाऱ्याने आणि त्याच्या साथीदारांनी कामोठे येथे शिवजयंतीच्या दिवशी झालेल्या वादावरून एका शेकाप कार्यकर्त्यांच्या घरी मध्यरात्री घुसून त्याला व त्याच्या आईला मारहाण करण्याची घटना घडली आहे. मध्यरात्री हॅप्पी सिंग च्या दारू पिलेल्या कार्यकर्त्यांनी हातात धारदार शस्त्र घेत विंग ड्रीम्स अपार्टमेंट सेक्टर ६ या सोसायटीमध्ये घुसून धिंगाणा घातला सीमा सुर्वे आणि रोशन सुर्वे यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. यामध्ये कार्यकर्ता असणाऱ्या रोशन सुर्वे याच्या पाठीवरती वार करण्यात आले. सध्या रोशन वर कळंबोली इथल्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महत्त्वाचं म्हणजे कामोठे पोलिसांनी ज्यांच्यावर हॅपी सिंग आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केला त्यांची तक्रारच घेतली जात नाही आहे. सत्ताधारी पक्षाचे स्थानिक आमदार यांचा खास असल्याचे दाखवत दबाव आणत हॅपी सिंग या भाजपच्या पदाधिकाऱ्याची सातत्याने कामोठ्यात गुंडगिरी सुरू आहे. विविध प्रकारची गैरकृत्य आणि काळे धंदे या हॅपी सिंगचे सुरू आहेत.
COMMENTS