भाजपचा पराभव करीत शत्रुघ्न सिन्हा, बाबुल सुप्रियो विजयी

Homeताज्या बातम्यादेश

भाजपचा पराभव करीत शत्रुघ्न सिन्हा, बाबुल सुप्रियो विजयी

कोलकाता : पश्‍चिम बंगालमध्ये आसनसोल या लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली असून, तृणमूल काँगे्रसकडून ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा उभे होते. या नि

कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत – रविकांत तुपकर
तरूणाची बसवर दगडफेक ः महिला प्रवाशी जखमी
कोयना प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित : डॉ. भारत पाटणकर

कोलकाता : पश्‍चिम बंगालमध्ये आसनसोल या लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली असून, तृणमूल काँगे्रसकडून ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा उभे होते. या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव करत शत्रुघ्न सिन्हा तब्बल 3 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये झालेला हा पराभव भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या बाबूल सुप्रियो यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी खासदारकीचाही राजीनामा दिली होता. त्यामुळे आसनसोल लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. बाबूल सुप्रियो यांना तृणमूल काँग्रेसने विधानसभेची उमेदवारी दिली. बाबुल सुप्रियो देखील मोठया मताधिक्याने विजयी झाले आहेत.

COMMENTS