Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवारांचे आता मिशन गोंदिया

प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात घेणार सभा

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटासोबत बहुसंख्य आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे अजित पवार

राज्यात मविआला 30-35 जागा मिळतील
पवारांनीच महाराष्ट्रातील घरं फोडली  
एकीकडे टीका, दुसरीकडे एकाच गाडीतून प्रवास

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटासोबत बहुसंख्य आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे अजित पवार गटासोबत 30 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असून, नागालँडच्या 7 आमदारांनी देखील अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. असे असतांना, शरद पवारांनी सभा घेण्याचा धडाका लावला असून, येवला येथील सभेतनंतर त्यांनी मिशन गोंदिया समोर ठेवले असून, प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार सभा घेणार आहेत.
राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवारांनी राज्यव्यापी दौर्‍याची घोषणा केली होती. त्यानुसार, त्यांनी आपली पहिली सभा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असणार्‍या नाशिकच्या येवल्यात घेतली. त्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा प्रफुल्ल पटेल यांच्याकडे वळवला आहे. पवारांचा येत्या 28 जुलै रोजी गोंदियात कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्याला शरद पवारांसह पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आदी बड्या नेत्यांची उपस्थिती राहणार. याच मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणी ची घोषणा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव वीरेंद्र जायस्वाल यांनी दिली. जायस्वाल गोंदियात शरद पवार गटाचे नेतृत्व करत आहेत. जायस्वाल यांनी प्रारंभी अजित पवारांना पाठिंबा दिला होता. पण ते पुन्हा शरद पवारांच्या गोटात सामील झाले. दुसरीकडे, शरद पवार गटाच्या 28 जुलैच्या मेळाव्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्या गोटात खळबळ माजली आहे. नव्या कार्यकारिणीत जिल्ह्यातील कोणत्या नेत्यांना स्थान मिळणार यावर सध्या जिल्ह्याच्या राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनलेत. तर प्रफुल्ल पटेल यांनी सुनील तटकरे यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. आता पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मोदी मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार आहे. त्यात पटेल याची जागा फिक्स मानली जात आहे.

COMMENTS