Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवारांच्या सभांचा धडाका होणार सुरू

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार

फटाका कारखान्यात स्फोट, 11 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात राज्य सहकारी बँक घोटाळ्याची ईडीकडून चौकशी
नितीन देसाई यांनी आत्महत्या करत संपवली जीवनयात्रा

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर उपस्थित राहिल्यामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र दुसर्‍याच दिवशी शरद पवार विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहिले होते. मात्र शरद पवार पुन्हा एकदा अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये येणार असून, ते राज्यभरात सभा घेण्याचा धडाका लावणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला येथील सभेनंतर आता बीडमध्ये सभेचे आयोजन केले आहे. शरद पवारांचा बीडनंतर दुसर्‍या जिल्ह्याचा दौरा देखील ठरला आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या उभारणीसाठी शरद पवारांनी राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार शरद पवारांनी पहिली सभा नाशिकच्या येवल्यात घेतली होती. यानंतर आता शरद पवारांनी बीडमध्ये सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. बीडमध्ये 17 ऑगस्ट रोजी शरद पवारांची सभा होणार आहे. पावसाळी अधिवेशन, पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा, अजित पवार गटाची भेट आणि विविध राजकीय घडामोडीमुळे शरद पवारांचा राज्य दौरा लांबणीवर पडला होता. शरद पवार हे 17 ऑगस्टपासून पुन्हा एकदा राज्याच्या दौर्‍याला सुरुवात करणार आहे. बीडनंतर शरद पवार हे जळगाव जिल्ह्याचा दौरा करणार आहे. शरद पवार हे 17 ऑगस्टपासून सभांचा धडाका लावणार आहेत. पहिली सभा बीड जिल्ह्यात घेणार आहेत. पवार हे बीडपासून सुरुवात करणार आहेत. त्यानंतर ते विभागवार एकेक जिल्ह्यात सभा घेतील. एका सभेनंतर दहा दिवसांचा ब्रेक घेतील. त्यानंतर पुढची सभा घेतील, अशी माहिती मिळाली आहे. बीडमध्ये 17 ऑगस्ट रोजी होणार्‍या सभेच्या तयारीची जबाबदारी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित पवारांच्या बंडानंतर संदीप क्षीरसगार यांनी त्यांचा पाठिंबा शरद पवार यांना जाहीर केला होता. अजित पवार गटाने बंड केल्यानंतर क्षीरसागर यांनी ’आपण सैदव साहेबांसोबतच’, असे जाहीर केले होते. क्षीरसागर यांच्याकडे सध्या राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद आहे.

COMMENTS