Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 शरद पवार यांनी मोदींना पाठिंबा द्यावा 

आठवले यांचे पवार यांना आवाहन

बीड प्रतिनिधी - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत

रागात पत्नीचे तुकडे करून हत्या
अनिलकुमार गायकवाड यांना ‘समृद्धी’साठी मुदतवाढ
जरांगे यांनी मुख्यमंत्र्यावर विश्‍वास ठेवावा; देवेंद्र फडणवीस

बीड प्रतिनिधी – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं आहे. पन्नास फुटांचा हार, जेसीबी वरून फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी अशा स्वरूपात या उत्साही कार्यकर्त्यांनी आठवलेंचं स्वागत केले आहे. रिपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या बीड शहरातील नूतन कार्यालयाचे आठवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील आढावा आठवले यांनी घेतला. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली असली तरी ती किती टिकेल हे सांगता येत नाही, असे भाकीत केले. प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले असले तरी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये गेलेले नाहीत. त्यामुळे ते कुठेही गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. तर शरद पवार यांनी नागालँड मध्ये जो पाठिंबा दिला तसा पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला देखील पाठिंबा द्यावा. आपल्यासारखा अनुभवी नेता आमच्या सोबत असला असला पाहिजे, त्यामुळे पवार यांनी महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडावे असे आवाहन आठवले यांनी पवारांना केले आहे.

COMMENTS