मुंबई प्रतिनिधी - निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन पक्ष चिन्ह दिलं आहे. तुतारी हे आता शरद पवार गटाचं नवीन पक्ष चिन्ह असणार आहे. पवार गटानेही
मुंबई प्रतिनिधी – निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन पक्ष चिन्ह दिलं आहे. तुतारी हे आता शरद पवार गटाचं नवीन पक्ष चिन्ह असणार आहे. पवार गटानेही आयोगाने दिलेलं चिन्ह मान्य केलं आहे. शरद पवार गटाकडून याबाबत ट्वीट करत सांगण्यात आलं आहे की, “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं, ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे
ट्विटमध्ये पुढे लिहिलं आहे की, ”महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, शरदचंद्र पवार यांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे”यावरच आपली प्रतिकिया देताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ”तुतारी ही युद्धाची निशाणी आहे. यापुढे जो रणसंग्राम होणार आहे, त्याची तयारी करताना तुतारी वाजवली की लोक सोबत येतील. हे नकळत भाग्यात आलं आहे. युद्धाला वेळ काळ नसतो. ते म्हणाले, आमचं चिन्ह थांबवावं, आमच्या पक्षाला नाव मिळू नये, म्हणून प्रयत्न झाले. मात्र काहीही झालं नाही. आम्हाला नावही मिळालं आणि चिन्हही मिळालं. हे चिन्ह इशारा देऊन गेलं, आमची युद्धाची तयारी सुरु झाली आहे. सोशल मीडियाच्या काळात हे चिन्ह घरोघरी पोहोचण्यासाठी वेळ लागणार नाही, असंही ते म्हणाले.
COMMENTS