Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेअर्स फसवणूक प्रकरणातील शंकर शिंदेचा जामीन नाकारला

शेवगाव : तालुक्यात कुरुडगाव येथील मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर रावसाहेब शिंदे यास बुधवारी (दि. ४) जिल्हा व सत्र न्यायालयाने नियमित जामीन देण्यास नकार दिला आहे. शेवगाव येथील रहिवासी पीडित अवधूत विनायक केदार यांनी शंकर शिंदे याच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार आरोपीने स्वतःची ‘एस.आर.इन्वेस्टर’ या नावाचे शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी असल्याचे भासवून गुंतवणुकीवर १२ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. या अमिषाला बळी पडून फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांनी आरोपीकडे एकूण २ कोटी ८९ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र आरोपीने ना अपेक्षित परतावा दिला, ना गुंतवलेली मूळ रक्कम परत केली.त्यामुळे दिनांक २५ जुलै २०२४ रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जाला पीडित अवधूत विनायक केदार यांनी ऍड.पंकज पद्माकर खराडे यांच्यामार्फत तीव्र विरोध केला. न्यायाधीश के. एस. कुलकर्णी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने उपलब्ध कागदपत्रे व तपासातील बाबींचा सखोल विचार केला. आरोपीने खोटी आश्वासने देऊन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. आरोपीला जामीन दिल्यास आरोपी पळून जाण्याची तसेच साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेही न्यायालयाने नमूद केले. या सर्व कारणांचा विचार करता आरोपीविरुद्ध ठोस पुरावे उपलब्ध असून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता शंकर रावसाहेब शिंदे यास जामीन देणे योग्य नसल्याचे सांगत त्याचा नियमित जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला. पीडित अवधूत विनायक केदार यांच्यावतीने ऍड.पंकज पद्माकर खराडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.

उमेद कात्रण चिकटवही स्पर्धेचा निकाल जाहीर
निर्मलाताई काकडे महाविद्यालयात रक्तदान शिबीर उत्साहात
ग्रामसभेचे ठराव डावलल्याचा आरोप

शेवगाव : तालुक्यात कुरुडगाव येथील मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर रावसाहेब शिंदे यास बुधवारी (दि. ४) जिल्हा व सत्र न्यायालयाने नियमित जामीन देण्यास नकार दिला आहे.

शेवगाव येथील रहिवासी पीडित अवधूत विनायक केदार यांनी शंकर शिंदे याच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार आरोपीने स्वतःची ‘एस.आर.इन्वेस्टर’ या नावाचे शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी असल्याचे भासवून गुंतवणुकीवर १२ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. या अमिषाला बळी पडून फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांनी आरोपीकडे एकूण २ कोटी ८९ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र आरोपीने ना अपेक्षित परतावा दिला, ना गुंतवलेली मूळ रक्कम परत केली.त्यामुळे दिनांक २५ जुलै २०२४ रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणात आरोपीविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जाला पीडित अवधूत विनायक केदार यांनी ऍड.पंकज पद्माकर खराडे यांच्यामार्फत तीव्र विरोध केला. न्यायाधीश के. एस. कुलकर्णी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने उपलब्ध कागदपत्रे व तपासातील बाबींचा सखोल विचार केला. आरोपीने खोटी आश्वासने देऊन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. आरोपीला जामीन दिल्यास आरोपी पळून जाण्याची तसेच साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेही न्यायालयाने नमूद केले. या सर्व कारणांचा विचार करता आरोपीविरुद्ध ठोस पुरावे उपलब्ध असून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता शंकर रावसाहेब शिंदे यास जामीन देणे योग्य नसल्याचे सांगत त्याचा नियमित जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला. पीडित अवधूत विनायक केदार यांच्यावतीने ऍड.पंकज पद्माकर खराडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.

COMMENTS