Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शनिशिंगणापूर देवस्थान बाबत पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार :आ.विठ्ठलराव लंघे पाटील

सोनई : शनिशिंगणापूर देवस्थान हे नेवासा तालुक्याचे वैभव आहे. येथे जर काही चुकीचं काम कोणी करून देवस्थानची बदनामी करत असेल तर याबाबत येणाऱ्या पावसा

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी नव वधु-वरास दिल्या शुभेच्छा
23 कोटीच्या अपहार प्रकरणी फरार कारकूनाच्या संभाजीनगरमधून आवळल्या मुस्क्या
श्री अंबाबाई मंदिरात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
Displaying 1002124803.jpg

सोनई : शनिशिंगणापूर देवस्थान हे नेवासा तालुक्याचे वैभव आहे. येथे जर काही चुकीचं काम कोणी करून देवस्थानची बदनामी करत असेल तर याबाबत येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात देवस्थानच्या कारभारा बाबत प्रश्न उपस्थित करण्यात येणार आहे असे माध्यम प्रतिनिधीशी बोलताना नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले.

यावेळी बोलताना आ.लंघे म्हणाले,सध्या शनिशिंगणापूर देवस्थान मध्ये अज्ञात व्यक्तींनी बनावट अँप तयार करून भाविकांच्या आर्थिक लुटी बाबत तालुक्यातील शनिभक्त व सामाजिक कार्यकर्त्यांनी  सार्वजनिक न्यास कार्यालय, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे तक्रारी दाखल केल्या आहेत. सदर सामाजिक कार्यकर्ते यांनी मला पण यासंबंधी माहिती दिली आहे. तरी शनीशिंगणापूर देवस्थान हे आपल्या नेवासा तालुक्याचे अध्यात्मिक वैभव आहे. यामुळे येथे जर कोणी व्यक्ती या बनावट अँपच्या माध्यमातून भाविकांची आर्थिक फसवणूक करत असेल आणि याला देवस्थान समिती आणि देवस्थानला ज्यांचे अभय आहे असे जर कोणी पाठीशी घालत असेल तर याचा मी जाहीर निषेध करतो.शनिशिंगणापूर देवस्थान हे देश विदेशात प्रसिद्ध आहे. येथे भाविक साडेसाती आणि ग्रहदोष निवारण करण्यासाठी पूजा अर्चा करण्यासाठी येतात.जर कोणी या भाविकांच्या श्रद्धेशी खेळून आर्थिक लूटमार या बनावट अँप माध्यमातून करत असेल तर याबाबत येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात देवस्थान प्रश्न शासन दरबारी मांडून शासनाचे लक्ष वेधण्यात येईल असे यावेळी आ.लंघे म्हणाले.

 सध्या मी देवस्थानच्या सर्व घडामोडी वर लक्ष ठेऊन आहे.शनिशिंगणापूर देवस्थानने सायबर पोलिसांकडे या बनावट अँप बाबत तक्रार दिल्याचे बातम्यावरून समजले. तरी सायबर पोलीस प्रशासन याबाबत पुढे काय तपास करतात याकडे लक्ष लागले आहे.सर्व तक्रारदार यांनी माझ्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून लक्ष घालण्याची विनंती केली आहे. यामुळे सदर प्रकरणात प्रशासना कडे या बनावट अँप गैरवापर तपासा बाबत पाठपुरावा करणार आहे. तसेच वेळोवेळी मागील देवस्थान मध्ये बोगस नोकर भरती असो देवस्थान मध्ये प्रशासक नियुक्ती बाबत प्रश्न मी विधीमंडळाच्या अधिवेशनात मांडले आहेत.बनावट अँप बाबत योग्य तपास लागला नाही आणि कोणाला जर अभय दिले तर याबाबत पावसाळी अधिवेशनात या प्रश्नावर आवाज उठवणार असल्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

COMMENTS