अवैध वाळुची वाहतुक करणाऱ्या आरोपींवर शनिशिंगणापुर पोलीसांनी केली कारवाई….

Homeताज्या बातम्या

अवैध वाळुची वाहतुक करणाऱ्या आरोपींवर शनिशिंगणापुर पोलीसांनी केली कारवाई….

अहिल्यानगर /दि. 01/07/2025 रोजी रात्री 11.03 वा. विभागीय रात्रगस्त ड्युटी असल्याने पोसई कारखेले, चा.पो.कॉ.हे. पवार, पो.कॉ. ठुबे असे शनिशिंगणापुर

राजधानीतील आक्रोश
कांदा निर्यातबंदी दिल्लीश्‍वरांना उठवावीच लागेल
रेल्वेतून एकाच दिवशी 120 लाख प्रवाशांनी केला प्रवास

अहिल्यानगर /
दि. 01/07/2025 रोजी रात्री 11.03 वा. विभागीय रात्रगस्त ड्युटी असल्याने पोसई कारखेले, चा.पो.कॉ.हे. पवार, पो.कॉ. ठुबे असे शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पेट्रोलिंग दरम्यान खरवंडी शिवारात छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हायवे रोडवर सीपीएफ कंपनीचे समोर कंपनीचे गेट पासुन सुमारे 200 मीटर अंतरावर रस्त्याचे कडेला दि. 02/07/2025 रोजी रात्री 04.45 वाजताचे सुमारास विनानंबरचे लाल रंगाची बाँडी असलेले डंपर वाहन दिसले तेव्हा आम्ही पोलीसांनी डंपर थांबवुन पाहणी केली असता सदर डंपरमध्ये वाळु मिळुन आली.

डंपरचालकास विचारपुस करीत असतानाच तो डंपरच्या पाठीमागुन आलेल्या चारचारी वाहनामध्ये बसुन पळून निघुन गेला. पळत असताना त्याचा मोबाईल फोन हा त्याचे खिशातुन पडला व तो आम्हा पोलीसांना मिळुन आला. सदरबाबत सपोनि शेळके सो यांना समजले असता ते व पोकाँ सुपारे हे घटना घडले ठिकाणी आले त्यावेळी सदरचे तीन ब्रास वाळु असलेले डंपर पळुन गेलेल्या आरोपीचा मोबाईल असे ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलो. व विनानंबरचे डंपरवरील अनोळखी चालक व चालकास पळवुन घेऊन जाणारा डंपरमालक यांचेविरुद्ध शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन गुरनं. 156/2025 भान्यास. कलम 303(2), 352, 126(2),221 3(5).

पर्यावरण कायदा अधिनियम 1986 चे कलम 3, 15 व खाण आणि खनिज कायदा 1957 चे कलम 4, 21 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर आरोपीकडुन 1) विनानंबरचे लाल रंगाचे, पांढरी कैबीन व बोनेटवर हेडलाईटचे वरती धन-लक्ष्मी असे असलेले डंपर त्याची किंमत अंदाजे 16,00,000/-, 2) तीन ब्रास वाळु तिची किंमत अंदाजे 18,000/- रुपये 3) एक आकाशी रंगाचा VIVO कपनीचा Y27 मॉडेलचा IMEI क्र. 860492068018454 व IMEI क्र. 860492068018447 त्याची किंमत अंदाजे 10,000/- रुपये 4) एक पांढरे रंगाची हयुंदाई कंपनीची व्हेरना कारगाडी क्र. MH-14-EC-2140 किंमत अंदाजे 5,00,000/- असा एकूण 21,28,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

गुन्हा दाखल झालेनंतर सदर गुन्ह्यातील दोन्ही फरार आरोपी यांना पोलीसांनी तीन तासांचे आत मानवी कौशल्यांच्या आधारे अटक केलेली आहे. सदर कारवाईवेळी पोसई कारखेले सो, चापोहेका पवार, सफौ सप्तीं, पोहेका घाडगे, पोहेकों मोकाटे, पोहेकों लबडे, पोहेकों घोडके, पोकाँ सुपारे, पोकाँ ठुबे, पोकों झिने, पोकाँ काळापहाड, पोकों शेजुळ असे अधिकारी अंमलदार उपस्थित होते.

सदरची कारवाई ही मा. श्री. सोमनाथ घार्गे सो, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा. श्री. वैभव कलुबमें सो, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर, मा. श्री. प्रशांत खैरे सो, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. सुनिल पाटील सो, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि आशिष शेळके सो, यांनी केली आहे.

COMMENTS